AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Worli Lift Crash | वरळी लिफ्ट दुर्घटना, पाच मजुरांच्या मृत्यू प्रकरणी दोघा जणांना अटक

वरळीतील हनुमान गल्लीत बीडीडी चाळ नंबर 118, 119 च्या समोर असलेल्या ललित अंबिका या निर्माणाधीन बिल्डिंगची लिफ्ट कोसळून चौघा मजुरांचा जागीच मृत्यू झाला होता, तर गंभीर जखमी झालेल्या एकाने उपचारादरम्यान प्राण गमावले.

Worli Lift Crash | वरळी लिफ्ट दुर्घटना, पाच मजुरांच्या मृत्यू प्रकरणी दोघा जणांना अटक
वरळी लिफ्ट दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू
| Edited By: | Updated on: Jul 25, 2021 | 10:44 AM
Share

मुंबई : वरळी लिफ्ट दुर्घटना प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. कंत्राटदार आणि सुपरवायझर यांच्यावर गुन्हा नोंदवून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मुंबईतील वरळी भागात निर्माणाधीन बिल्डिंगची लिफ्ट कोसळून शनिवारी पाच मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

वरळीतील हनुमान गल्लीत बीडीडी चाळ नंबर 118, 119 च्या समोर असलेल्या ललित अंबिका या निर्माणाधीन बिल्डिंगची लिफ्ट कोसळून चौघा मजुरांचा जागीच मृत्यू झाला होता, तर गंभीर जखमी झालेल्या एकाने उपचारादरम्यान प्राण गमावले. मृतांमध्ये अविनाश दास (35 वर्षे), भारत मंडल (27 वर्षे), चिन्मय मंडल (33 वर्षे) आणि एका 45 वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे.

कंत्राटदार आणि सुपरवायझरवर गुन्हा

एनएम जोशी पोलीस ठाण्यात भादंवि कलम 304 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंत्राटदार आणि सुपरवायझर यांच्यावर गुन्हा नोंदवून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अटकेतील आरोपींनी कामगारांना सेफ्टी बेल्ट, हेल्मेट यासारख्या सुविधा पुरवल्या नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

शनिवारी संध्याकाळी 5.45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत मदतकार्य केले होते. जखमींना तातडीने केईएम रुग्णालय आणि नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

आदित्य ठाकरेंची घटनास्थळाला भेट

वरळीचे आमदार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळाला भेट दिली. ओव्हरलोडमुळे ही लिफ्ट दुर्घटना घडल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे, अशी शक्यता त्यांनी वर्तवली होती.

संबंधित बातम्या

BREAKING साताऱ्यातील मीरगावात दरड कोसळली, दहा जणांचा मृत्यू

लिफ्ट कोसळून 4 जणांचा मृत्यू, वरळीच्या हनुमान गल्लीतील धक्कादायक घटना

(Mumbai Worli Lift Crash Accident Elevator collapsed killed five workers in Building near Hanuman Galli two booked)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.