मुंबई लोकलमध्ये घातपातासाठी ‘आऊटसोर्सिंग’, ATS च्या तपासात दहशतवादी कटाची धक्कादायक माहिती

लोकलमध्ये घातपात घडवण्याचं षडयंत्र अंमलात आणण्यासाठी आरोपींना बजेट दिले होते. यातील बहुतांश लोक एकमेकांना ओळखत नव्हते. गेल्या आठवड्यात एटीएसने जोगेश्वरी येथील झाकीर शेख आणि मुंब्रा येथून रिझवान मोमीन या दोघांना अटक केली होती

मुंबई लोकलमध्ये घातपातासाठी 'आऊटसोर्सिंग', ATS च्या तपासात दहशतवादी कटाची धक्कादायक माहिती
Mumbai Local
Follow us
| Updated on: Sep 23, 2021 | 9:43 AM

मुंबई : दहशतवाद्यांचा मुंबई लोकलमध्ये घातपात करण्याचा कट होता, यासाठी ‘आऊटसोर्सिंग’ची पद्धत वापरण्यात आली, अशी धक्कादायक माहिती महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या तपासात समोर आली आहे. कटाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी स्थानिकांवर सोपवण्यात आल्याची माहिती आहे.

काय आहे प्रकरण?

दहशतवादी कटातही आऊटसोर्सिंगची पद्धत वापरल्याने अनेकांना धक्का बसला आहे. लोकलमध्ये घातपात घडवण्याचं षडयंत्र अंमलात आणण्यासाठी आरोपींना बजेट दिले होते. यातील बहुतांश लोक एकमेकांना ओळखत नव्हते. गेल्या आठवड्यात एटीएसने जोगेश्वरी येथील झाकीर शेख आणि मुंब्रा येथून रिझवान मोमीन या दोघांना अटक केली होती. इयत्ता नववीचा ड्रॉपआऊट असलेला झाकीर शेख हा टॅक्सी चालक आहे, तर मोमीन ट्युशन टीचर आहे.

अँथनी कौन है

17 सप्टेंबर रोजी एटीएसने यूएपीए कायद्याच्या कलम 18 अंतर्गत झाकीर शेख आणि त्याचा कथित परदेशी हस्तक अँथनी उर्फ अनिस उर्फ अन्वर उर्फ अन्नू यांच्याविरोधात दहशतवादी कृत्य करण्याचा कट रचल्याप्रकरणी एफआयआर नोंदवला होता. महाराष्ट्र एटीएस प्रमुख विनीत अग्रवाल यांनी सांगितले की, मुंबईत अटक केलेले लोक अँथनीच्या संपर्कात होते, त्याला इतर ठिकाणाहून सूचना मिळाल्या होत्या.

कसे होते मॉड्यूल

दहशतवादी मॉड्यूलच्या अभियंत्यांनी बजेटचे वाटप केले. या षडयंत्र प्रकरणात बजेटबाबत अचूक तपशील मिळवण्याचा सध्या पोलीस प्रयत्न करत आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ‘ए’ने दहशतवादी कृत्याच्या अंमलबजावणीचे काम ‘बी’ला आऊटसोर्स केल्यासारखे आहे. ज्याने हे काम करण्यासाठी ‘सी’ (स्थानिक संशयितांचा एक गट) शी संपर्क साधला. म्हणून, ‘सी’ला ‘ए’ माहिती नाही. मात्र तुम्हाला याचे पैसे मिळतील, याची हमी स्थानिकांना देण्यात आली होती.

फोन तोडून नाल्यात फेकला

केवळ शेखच नाही तर मोमीन देखील अँथनीच्या संपर्कात होता. पोलीस आपल्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता वाटल्याने शेखने त्याचा फोन मोमीनला नष्ट करण्यासाठी दिला होता. त्याने तो तोडून घराजवळच्या नाल्यात टाकला. अधिक तपशील मिळवण्यासाठी सायबर फॉरेन्सिक अहवालाची आणि तुटलेल्या फोनवरून डेटा पुनर्प्राप्त करण्याची सध्या एटीएस वाट पाहत आहेत.

दरम्यान, एकही दहशतवादी मुंबईत आला नाही, त्यांचा कुणी साथीदारही आला नाही, महाराष्ट्रात कोणतेही स्फोटक सापडलेले नाहीत, असं स्पष्टीकरण एटीएस प्रमुख विनित अग्रवाल (Vineet Agarwal) यांनी गेल्या आठवड्यात दिले होते. मुंबईतील धारावीचा रहिवासी असलेला समीर कालिया उर्फ जान मोहम्मद शेख (Jan Mohammad Shaikh) याचे 20 वर्ष जुने दाऊद कनेक्शन उघड झाल्याचेही त्यांनी सांगितले होते. एटीएस प्रमुखांनी पत्रकार परिषद घेत या संदर्भात माहिती दिली होती. देशात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा मोठा कट दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने उधळून लावला होता. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याची योजना असल्याचं समोर आलं आहे.

संबंधित बातम्या :

पैशांसाठी नाही, ‘या’ कारणासाठी पाकिस्तानात दहशतवादी प्रशिक्षण, अटकेतील संशयितांचा खळबळजनक खुलासा

मित्रांसोबत यूपीला जातो म्हणताच पत्नीला आलेला संशय, संशयित दहशतवादी जान मोहम्मदने कुटुंबीयांना काय काय सांगितलं?

Ak 47 कशी चालवायची, पाठलागापासून कसे वाचायचे? संशयित दहशतवाद्यांना पाकिस्तानात कोणकोणते प्रशिक्षण?

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.