AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai News | मुंबईत काय चाललय? धावत्या रिक्षात प्रियकराच प्रेयसीसोबत धक्कादायक कृत्य

Mumbai News | ते दोघे रिक्षात बसले. रिक्षा सुरु झाली. त्यानंतर दोघांमधलं बोलणं अशा वळवणावर गेलं की, प्रियकराने थेट टोकाच पाऊल उचललं. तिच्या विश्वासाला तडा दिला. धावत्या रिक्षात जे घडलं, त्याने सगळेच हादरले.

Mumbai News | मुंबईत काय चाललय? धावत्या रिक्षात प्रियकराच प्रेयसीसोबत धक्कादायक कृत्य
Mumbai Man Murders Girlfriend In Moving Autorickshaw
| Updated on: Jun 20, 2023 | 10:23 AM
Share

मुंबई : मायानगरी मुंबई देशातील इतर शहरांच्या तुलनेत महिलांसाठी सुरक्षित समजली जाते. पण आता कदाचित ही ओळख पुसत चालली आहे. महिलांविरोधात घडणारे गुन्हे रोखण्यासाठी कठोर कायदे करण्यात आले. पण महिलांविरोधात घडणाऱ्या गुन्ह्यांची संख्या कमी झालेली नाही. उलट वाढत चाललीय. मुंबईत महिलांना लक्ष्य करुन होणारे गुन्हे लक्षात घेता, परिस्थिती चिंताजनक आहे. मागच्या आठवड्यात दिवसाढवळ्या मुंबई लोकलमध्ये परिक्षेसाठी चालेल्या एका तरुणीवर जबरदस्तीचा प्रयत्न झाला.

त्यानंतर गोवंडी येथील एका खासगी रुग्णालयात बोगस डॉक्टरने उपचारासाठी आलेल्या महिलेचा विनयभंग केला. आता घडलेली तिसरी घटना त्यापेक्षा भयानक आहे.

साकीनाका भागात धक्कादायक घटना

मुंबईत धावत्या ऑटोरिक्षामध्ये प्रियकराने प्रेयसीचा गळा चिरुन हत्या केली. सोमवारी साकीनाका भागात ही धक्कादायक घटना घडली. आरोपीने त्यानंतर स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. तो घटनास्थळावरुन नंतर पसार झाला, असं पोलिसांनी सांगितलं.

आरोपीने काय केलं?

मुंबईत साकीनाका येथे खैरानी रोड दत्तनगर येथे धावत्या ऑटिरिक्षामध्ये ही धक्कादायक घटना घडली. रिक्षामध्येच या जोडप्यात भांडण झालं. आरोपीने तिथेच त्याच्याजवळ असलेल्या धारदार शस्त्राने महिलेचा गळा चिरला व तिथून पसार झाला.

ती रिक्षातून बाहेर पडली, पण….

“दीपक बोरसेने धावत्या रिक्षामध्ये पांचशिला जामदार या तरुणीचा गळा चिरला. स्वत:चा जीव वाचवण्यासाठी ती रिक्षातून बाहेर पडली. पण काही अंतरावर जाऊन पडली. बोरसेने गळा कापून स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला” असं अधिकाऱ्याने सांगितलं. नेमकं काय घडलं?

“रस्त्यावरुन जाणाऱ्या पादचाऱ्यांनी पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. दोघांना रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी तपासल्यानंतर महिलेला मृत घोषित केलं. आरोपीवर उपचार सुरु आहेत” असं पोलिसांनी सांगितलं. महिला आणि आरोपी दोघे परस्परांना ओळखत होते. रिक्षात बसल्यानंतर सुरु झालेल्या वादावादीतून आरोपीने हे भयानक कृत्य केलं. पोलिसांनी आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला आहे.

पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल
पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल.
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा.
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी.
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'.
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?.
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा.
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा....
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा.....
"'लाडकी बहीण' बंद व्हावी म्हणून कोर्टात जाणारा नानांचा माणूस..."
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं...
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं....