जुना वाद सोडवून तीन यार दारु प्यायला बसले, पण धुलिवंदनालाच खेळली ‘रक्ताची होळी’

मयत लखन गायकवाड आणि आरोपी चेतन मंडल आणि मुन्ना नगराळे हे तिघंही मित्र होते मात्र त्यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. ( Nagpur Crime friend Dhulivandan)

जुना वाद सोडवून तीन यार दारु प्यायला बसले, पण धुलिवंदनालाच खेळली 'रक्ताची होळी'
नागपुरात दोघा आरोपींकडून मित्राची हत्या
Follow us
| Updated on: Mar 30, 2021 | 4:17 PM

नागपूर : धुलिवंदनाच्या दिवशी सगळे जण घरात सण साजरा करत होते, मात्र नागपूरच्या मोक्षधाम परिसरात दोघे जण रक्ताची होळी खेळले. वादानंतर दुरावलेले मित्र होळीला दारु पिण्यासाठी एकत्र आले खरे, पण त्या दिवशी एका मित्राच्या हत्येने दिवसाची अखेर झाली. (Nagpur Crime Two Accuse Kills friend on Dhulivandan)

धुलिवंदन आटपून काल (सोमवारी) संध्याकाळी स्वच्छता गृहातील कर्मचारी आणि त्याच्या ओळखीचे दोघे जण नागपुरातील मोक्षधाम परिसरात दारु पित बसले होते. मयत लखन गायकवाड आणि आरोपी चेतन मंडल आणि मुन्ना नगराळे हे तिघंही मित्र होते मात्र त्यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाला होता.

दारुच्या नशेत जुना वाद उकरला

दारूच्या नशेत जुना वाद आणखी उफाळून आला आणि तिघांमध्ये पुन्हा जोरदार भांडण झालं. रागाच्या भरात आरोपी चेतन मंडल आणि मुन्ना नगराळे या दोघांनी लखन गायकवाडच्या शरीरावर धारदार शस्त्राने जोरदार वार केले. यामध्ये लखनचा मृत्यू झाला.

लखनने प्राण सोडल्याचे समजताच दोघांनी त्या ठिकाणवरुन पळ काढला. पोलिसांनी या दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरु आहे. जुने मित्र वाद झाल्याने दुरावले होते, ते होळीला दारु पिण्याच्या निमित्ताने एकत्र आले. पण होळीच्या सणाला गालबोट लावत आता कायमचे दुरावले.

अमरावतीत सहा जणांनी तरुणाला धुतलं

दुसरीकडे, जुन्या वादातून धुलिवंदनाच्या दिवशीच अमरावतीतही राडा झाल्याचं पाहायला मिळालं. अमरावती शहरातील नवसारी जवळील यश बारजवळ भूषण पोहोकार (21) रस्त्याने जात होता. त्यावेळी जुन्या रागाचा वचपा काढण्यासाठी 6 जण दबा धरुन बसले होते. त्यांनी भूषणला पकडून लाथा-बुक्क्यांसह काठीने जबरदस्त मारहाण केली. या मारहाणीत भूषण गंभीर जखमी झाला.

भूषण हा मृत्यूशी झुंज देत आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यातील जखमी तरुण आणि मारेकरी हे दोघेही गुंडगिरी प्रवृत्तीचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

संबंधित बातम्या :

जुन्या रागाचा वचपा काढण्यासाठी बारजवळच राडा, धुलिवंदनालाच तरुणाला बेदम मारहाण

गुन्हा वेगळाच, घाबरलेल्या आरोपीने पुण्याच्या बर्थडे पार्टीतील गँगरेपची कहाणी घडाघडा सांगितली…

(Nagpur Crime Two Accuse Kills friend on Dhulivandan)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.