15 वर्षीय राज पांडेचं अपहरण करुन हत्या, राजने गायलेल्या ‘आयेगी मेरी याद’ गाण्याने नागपूरकरांच्या डोळ्यात पाणी

15 वर्षीय राज पांडेचे अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. त्याच्या हत्येनंतर त्याने गायलेलं आयेगी मेरी याद हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल होतंय. या गाण्याने नागपूरकरांच्या डोळ्यात पाणी आहे. (Raj Pandey kidnapped and murdered in Nagpur)

15 वर्षीय राज पांडेचं अपहरण करुन हत्या, राजने गायलेल्या 'आयेगी मेरी याद' गाण्याने नागपूरकरांच्या डोळ्यात पाणी
राज पांडेचं अपहरण करुन हत्या, नागपुरातील घटना

नागपूर : पूर्ववैमनस्यातून नागपूरमध्ये एका 15 वर्षांच्या मुलाचे अपहरण करुन त्याची निर्घृण हत्या (Murder) करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. राज पांडे असे मृत बालकाचे नाव आहे. राज हा इंदिरा नगर परिसरात राहत असून तो गुरुवारी खेळण्यासाठी घराजवळील मैदानात गेला होता. त्यावेळी राजचे अपहरण करण्यात आले. आणि त्यानंतर त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. त्याच्या हत्येनंतर त्याने गायलेलं आयेगी मेरी याद हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल होतंय. या गाण्याने नागपूरकरांच्या डोळ्यात पाणी आहे.  (15 year old Raj pandey kidnapped and murdered in Nagpur Video of the song sung by Raj goes viral)

नेमकी घटना काय?

सुरजकुमार साहू याने राजचे अपहरण केले. त्यानंतर राजची आई गीता पांडे यांना फोन केला. त्यावेळी सुरजकुमार साहू याने राजचा काका मनोज पांडे याचं डोकं कापून मला मोबाईलवर फोटो पाठवा, अशी मागणी केली. अन्यथा मी तुमच्या मुलाला ठार मारेन, अशी धमकी सुरजकुमार साहू याने दिली होती.

यानंतर राजच्या आई-वडिलांनी पोलिसांत धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी तातडीने राजचा शोध सुरु केला होता. मात्र, शुक्रवारी सुरजकुमार साहूने राजचा खून केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी आता सुरजकुमार साहूला ताब्यात घेतले असून याप्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

हत्येनंतर राजने गायलेलं आयेगी मेरी याद गाणं व्हायरल

15 वर्षांच्या राज पांडेने गायलेल्या एका गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. आयेगी तुम्हे मेरी याद, वफाये मुझे भूल ना पाओगे… करोगे फरियाद रो रो के… किसी को बता ना पाओगे, असं बोल असलेलं राजच्या आवाजातील गाणं अनेकांच्या हृदय पिळवटून टाकतंय.

या व्हिडीओ बरोबरच राजचे आणखी काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. राजचा आवाज चांगला होता. एकंदर त्याला गायनाचा छंद होता, असं व्हायरल झालेल्या व्हिडीओवरुन प्रथमदर्शनी दिसून येतंय.

(15 year old Raj pandey kidnapped and murdered in Nagpur Video of the song sung by Raj goes viral)

हे ही वाचा :

काकाचं मुंडकं कापून मला फोटो पाठवा, मागणी मान्य न केल्याने 15 वर्षांच्या मुलाची हत्या

ठाण्यात मोबाईल चोरट्यांची इतकी हिंमत? चालत्या रिक्षेतल्या महिलेच्या हातून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न, निष्पाप महिलेला मृत्यू

शेतीसाठी नुकतीच विहिर खोदली, अचानक विहिरीच्या पाण्यात प्लास्टिकच्या कागदात गुंडाळलेला मृतदेह, शेतकरी जागेवरच स्तब्ध

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI