VIDEO : नागपूरमध्ये गारमेंटच्या दुकानात दीड लाखाची चोरी, घटना सीसीटीव्हीत कैद

सुनील ढगे

सुनील ढगे | Edited By: वैजंता गोगावले, Tv9 मराठी

Updated on: Apr 30, 2022 | 7:17 PM

इतवारी मार्केट परिसरात हे गारमेंटचे दुकान आहे. रात्री मार्केटमधील सर्व दुकाने बंद झाल्यानंतर या परिसरात कुणीही नसते. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी पहाटे अंधारात दुकानाच्या शटरचे लॉक तोडले. दुकानातील दीड लाखाची रोकड घेत दुकानातील सर्व कपडे अस्ताव्यस्त केले. मात्र चोरट्यांनी कपडे नेले नाहीत. सकाळी नेहमीप्रमाणे दुकान मालक दुकान उघडायला आल्यानंतर चोरीचा प्रकार लक्षात आला.

VIDEO : नागपूरमध्ये गारमेंटच्या दुकानात दीड लाखाची चोरी, घटना सीसीटीव्हीत कैद
नागपूरमध्ये गारमेंटच्या दुकानात दीड लाखाची चोरी
Image Credit source: TV9

नागपूर : दुकानाचे शटर तोडून जवळपास दीड लाख रुपये रोकड (Cash) चोरल्याची घटना नागपूरच्या तहसिल पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. ही चोरीची सर्व घटना सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत तीन चोरट्यांनी दुकानाचे लॉक तोडून शटर उघडलं आणि आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील काऊंटरमध्ये असलेले जवळपास एक ते दीड लाख रुपये एका पिशवीत भरले आणि पोबारा केला. याप्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्हीच्या आधारे पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे व्यापारी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Theft of Rs 1.5 lakh from a garment shop in Nagpur, incident captured on CCTV)

शटर तोडून रोकड चोरली

इतवारी मार्केट परिसरात हे गारमेंटचे दुकान आहे. रात्री मार्केटमधील सर्व दुकाने बंद झाल्यानंतर या परिसरात कुणीही नसते. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी पहाटे अंधारात दुकानाच्या शटरचे लॉक तोडले. दुकानातील दीड लाखाची रोकड घेत दुकानातील सर्व कपडे अस्ताव्यस्त केले. मात्र चोरट्यांनी कपडे नेले नाहीत. सकाळी नेहमीप्रमाणे दुकान मालक दुकान उघडायला आल्यानंतर चोरीचा प्रकार लक्षात आला. त्यांनी तात्काळ दुकानातील सीसीटीव्ही चेक केला असता चोरीची प्रकार उघडकीस आला. दुकानमालकाने तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत चोरट्यांचा शोध सुरु केला आहे. या परिसरात मोठी वर्दळ सुरू असते. या ठिकाणी अनेक दुकान आहेत. मात्र रात्रीच्या वेळी घडलेल्या या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. (Theft of Rs 1.5 lakh from a garment shop in Nagpur, incident captured on CCTV)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI