AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Murder : नागपूरमध्ये अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या, भरदिवसा दगडाने ठेचले

नागपूरच्या पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीत बाबा बुध्दाजी नगरमध्ये आज सकाळी 10 च्या सुमारास आसिफ खान या युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. मयत आसिफचे आरोप दीक्षित भगवान जनबंधु याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते.

Nagpur Murder : नागपूरमध्ये अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या, भरदिवसा दगडाने ठेचले
दौंडमध्ये अज्ञात कारणावरुन व्यक्तीची हत्याImage Credit source: tv9
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Jul 18, 2022 | 7:30 PM
Share

नागपूर : नागपुरात अनैतिक संबंधातून युवका (Youth)ची भर दिवसा दगडाने ठेचून हत्या (Murder) करण्यात आल्याची घटना आज सकाळी घडली. मृतकाचे आरोपीच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध (Immoral Relation) होते. मृतकाला वारंवार समजावून सुद्धा तो ऐकत नसल्याने ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती कळते. आसिफ खान असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पाचपावली पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. दीक्षित भगवान जनबंधु असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

वारंवार समजावूनही मयताने अनैतिक संबंध सुरुच ठेवले

नागपूरच्या पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीत बाबा बुध्दाजी नगरमध्ये आज सकाळी 10 च्या सुमारास आसिफ खान या युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. मयत आसिफचे आरोप दीक्षित भगवान जनबंधु याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. याबाबत आरोपीने आसिफला अनेकदा हे संबंध तोडण्यासाठी समजावले होते. मात्र तरीही आसिफ अनैतिक संबंध तोडायला तयार नव्हता. आरोपीचे आसिफ सोबत याच विषयावरून भांडण झालं होतं. परंतु आसिफने आरोपीच्या पत्नीसोबत आपले संबंध कायम ठेवले होते. त्याचा राग मनात घेऊन आज सकाळी आरोपीने आसिफला गाठले व आसिफच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून त्याचा डोक्यावर दगडाने ठेचून हत्या केली. पाचपावली पोलिसांनी आरोपी दिक्षित भगवान जनबंधु याला अटक केली असून पुढील तपास करीत आहे. (Youth killed by womans husband due to immoral relationship in Nagpur)

Follow Us
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
आदित्य ठाकरे यांच्याकडून त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... एकीकडे कोर्टात सुनावणी सुरू दुसरीकडे शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
विनोद तावडे: विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
कंगना राणावत यांची टीका: गृह मंत्रालयाबाबत दुहेरी भूमिका
राहुल गांधींच्या भूमिकेवर कंगना राणावत यांची टीका: गृह मंत्रालयाबाबत दुहेरी भूमिका