8 पुरुषांसोबत सुहागरात साजरी करून हृदय तोडणारी नागपूरातील महिला, फातिमाने दाखवले हसीन स्वप्न; म्हणाली, ‘चला आता…’
नागपूर पोलिसांनी एका अशा महिलेला अटक केली आहे, जिने आठ पुरुषांशी लग्न करून त्यांना फसवले आहे. तिच्या एका पतीचा दावा आहे की, या महिलेने सुमारे 50 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. चला, जाणून घेऊया हा सारा प्रकार काय आहे.

नागपुरातून एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. येथील एका महिलेने एक किंवा दोन नव्हे, तर तब्बल आठ वेळा लग्न केले. विशेष म्हणजे, ही महिला नवव्या नवऱ्याच्या शोधात असतानाच तिच्यासोबत असा काही घोटाळा झाला की, तुम्ही देखील चकीत व्हाल. चला, जाणून घेऊया या वधूने असे का केले.
समिरा फातिमा असे आहे तिचे नाव
या महिलेची ओळख समिरा फातिमा अशी आहे. उच्च शिक्षित आणि शाळेत शिक्षिका म्हणून काम केलेली समिरा सोशल मीडियाच्या माध्यमातून विवाहित पुरुषांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवायची. स्वतःला घटस्फोटित सांगून ती सहानुभूती मिळवायची आणि म्हणायची, ‘मला आधार द्या, मी तुमची दुसरी पत्नी म्हणून राहीन.’ या बहाण्याने ती पुरुषांशी लग्न करायची, सुहागरात साजरी करायची आणि मग त्यांचे हृदय तोडायची. होय, ही महिला एका महिन्याच्या आत भांडण करून ब्लॅकमेलिंग सुरू करायची. असा कांड तिने एक किंवा दोन नव्हे, तर आठ विवाहित पुरुषांसोबत केला आहे. आता ती नवव्या पतीच्या शोधात होती.
वाचा: गर्दीचा फायदा घेत नको तिकडे करत होता स्पर्श, नंतर जे घडलं… मुलींनी तर हा व्हिडीओ पाहायलाच हवा
15 वर्षांत कोट्यवधींची लूट
पोलिसांना संशय आहे की, गेल्या 15 वर्षांपासून ती ही फसवणूक करत होती. ती एकटी नव्हती, तर एका संगठित टोळीच्या साथीने हे कट रचायची. पोलिसांना मिळालेल्या प्राथमिक पुराव्यांनुसार, फातिमाने एका पीडितेकडून 50 लाख रुपये आणि दुसऱ्याकडून 15 लाख रुपये लुटले आहेत. ही रक्कम ती लग्नानंतर पतींना वेगवेगळ्या बहाण्यांनी ब्लॅकमेल करून वसूल करायची. जेव्हा जेव्हा पोलिस तिच्या अटकेपर्यंत पोहोचायचे, तेव्हा ती खोट्या गरोदरपणाचा दावा करून पळून जायची.
आठ पतींची एक वधू
मात्र, यावेळी पोलिसांनी पूर्ण तयारीनिशी 29 जुलै रोजी नागपुरातील एका चहाच्या टपरीवरून तिला अटक केली. सध्या नागपूर पोलिसांनी समिरा फातिमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि तिच्या संपूर्ण नेटवर्कची चौकशी सुरू केली आहे. पोलिसांचा विश्वास आहे की, या प्रकरणात आणखी अनेक पीडित समोर येऊ शकतात आणि टोळीशी संबंधित इतर लोकांची अटक लवकरच होऊ शकते.
