AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yeola Loot : येवल्यातील चोरीचा प्रयत्न आणि कॅशियरचा मृ्त्यू प्रकरण, पाच आरोपींना अटक

सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने येवला शहर पोलिसांनी कोपरगांव पिपल्स को. ऑप. बँक, शाखा येवला येथील डम डाटा स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांचे मदतीने घेवून संशयित मोबाईल नंबर ट्रेस केले. त्यानंतर त्याबाबत अहमदाबाद पोलिसांशी संपर्क साधून सीसीटीव्ही फुटेज पाठवले.

Yeola Loot : येवल्यातील चोरीचा प्रयत्न आणि कॅशियरचा मृ्त्यू प्रकरण, पाच आरोपींना अटक
चोरीचा प्रयत्न आणि कॅशिअरचा मृत्यू प्रकरणी पाच आरोपींना अटक
Updated on: Aug 25, 2022 | 8:40 PM
Share

येवला : येवल्यातील कोटमगाव रोड येथे कांदा व्यापाराच्या कॅशियरकडून भररस्त्यात बॅग ओढण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना येवला शहर पोलिसांच्या पथकाने गुजरात येथून अटक (Arrest) केली आहे. आरोपींकडून दोन मोटरसायकल (Two Bikes) पण जप्त करण्यात आली आहे. येवला शहरातील कांदा व्यापारी सुनीलचंद नंदलाल अट्टल यांचे कॅशिअर विजय नानासाहेब गायकवाड व राहुल उगले हे बँकेतून पैसे घेऊन मोटारसायकलवरुन येत होते. यावेळी चोरट्यांनी त्यांचा पाठलाग केला. यावेळी पैशाची बॅग ओढताना झालेल्या झटापटीत गायकवाड आणि उगले यांचा बाईकवरुन तोल गेला. रस्त्याच्या डिव्हायडरला धडकून विजय गायकवाड यांचा मृत्यू (Death) झाला. तर उगले जखमी झाले होते. याप्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यात नोंद करत पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

चोरट्यांच्या झटापटील बाईकवरुन तोल जाऊन एका कॅशियरचा मृत्यू

पोलिसांकडून मिळालेली माहितीनुसार, 21 जुलै रोजी येवला शहरातील कांदा व्यापारी सुनीलचंद नंदलाल अट्टल यांचे कॅशिअर विजय नानासाहेब गायकवाड आणि राहुल उगले हे कोपरगांव पिपल्स को-ऑप बँकेतून 7,25000 रुपये काढून कोटमगांव रोडने अंदरसूलकडे ज्युपिटर मोटरसायकलने जात होते. यावेळी भिमालय जिम समोर मागून मोटारसायकलवर आलेल्या आरोपींनी राहुल उगले यांच्या हातातील जेवणाचा डबा असलेल्या पिशवीत पैसे आहेत असे समजून ती ओढून भरधाव वेगाने तेथून निघून गेले. या झटापटीत विजय गायकवाड यांचा मोटरसायकलवरून तोल गेल्याने ते रत्याच्या डिव्हायडरला धडकले. यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर राहुल उगले हे जखमी झाले होते. सदर घटनेच्या अनुषंगाने येवला शहर पोलीस ठाण्यात कलम 304, 393, 337, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनास्थळावर अॅक्टिव्ह मोबाईल नंबर ट्रेस करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या

सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने येवला शहर पोलिसांनी कोपरगांव पिपल्स को. ऑप. बँक, शाखा येवला येथील डम डाटा स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांचे मदतीने घेवून संशयित मोबाईल नंबर ट्रेस केले. त्यानंतर त्याबाबत अहमदाबाद पोलिसांशी संपर्क साधून सीसीटीव्ही फुटेज पाठवले. सीसीटीव्ही फुटेजवरुन सदर गुन्ह्यातील आरोपी अहमदाबाद येथील असल्याचे निष्पन्न झाले. क्राईम ब्रॅन्च अहमदाबाद यांच्या मदतीने आरोपी आकाश प्रकाश ईद्रेकर, सन्नी सुरेशभाई भादरभाई तमंचे, अजय अशोकभाई जाक्सीभाई तमंचे, सुशांत ऊर्फ विक्की विनुभाई ईद्रेकर, विकास ऊर्फ ठाकूर छगनभाई रणछोडभाई भोगेकर यांना गुन्ह्यात वापरल्याले दोन मोटरसायकलसह ताब्यात घेत येवला येथे आणण्यात आले. आरोपीस प्रथम न्यायदंडाधिकारी यांच्या समोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना 30 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (Death and theft case of cashier of onion trader in Yevla, five accused arrested)

18 महिन्यांचा संघर्ष, पांढरं कपाळ अन् विषाचा घोट
18 महिन्यांचा संघर्ष, पांढरं कपाळ अन् विषाचा घोट.
उद्धव ठाकरेंकडून दानवेंचं कौतुक अन् विरोधकांना चिमटे
उद्धव ठाकरेंकडून दानवेंचं कौतुक अन् विरोधकांना चिमटे.
दानवेंच्या निरोप समारंभात फडणवीसांची शाल-पागोट्यातून टोलेबाजी
दानवेंच्या निरोप समारंभात फडणवीसांची शाल-पागोट्यातून टोलेबाजी.
Mahadev Munde Case:माझ्या सिंदूरला न्याय द्या, ज्ञानेश्वरी मुंडे भावूक
Mahadev Munde Case:माझ्या सिंदूरला न्याय द्या, ज्ञानेश्वरी मुंडे भावूक.
उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांची भेट अन् हसून गप्पा
उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांची भेट अन् हसून गप्पा.
महाजन मनसेत नाराज? अमित ठाकरेंचा फोन; तुम्ही मीडियाकडे का गेलात..
महाजन मनसेत नाराज? अमित ठाकरेंचा फोन; तुम्ही मीडियाकडे का गेलात...
दोन्ही सेना अन्यायाविरुद्ध रस्त्यावर लढणाऱ्या - उपमुख्यमंत्री शिंदे
दोन्ही सेना अन्यायाविरुद्ध रस्त्यावर लढणाऱ्या - उपमुख्यमंत्री शिंदे.
पायाला जखमा, 12 दिवस खांद्यावर नांगर अन् मुंबईच्या दिशेन पायपीट
पायाला जखमा, 12 दिवस खांद्यावर नांगर अन् मुंबईच्या दिशेन पायपीट.
नितेश राणेंच्या खात्याची जाहिरात सामनाच्या फ्रंट पेजवर; राऊत म्हणाले..
नितेश राणेंच्या खात्याची जाहिरात सामनाच्या फ्रंट पेजवर; राऊत म्हणाले...
शिंदेंसोबतच्या युतीवर आनंदराज आंबेडकरांची मोठी प्रतिक्रिया
शिंदेंसोबतच्या युतीवर आनंदराज आंबेडकरांची मोठी प्रतिक्रिया.