AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन मुलाचा बलात्कार, अश्लील व्हिडिओ दाखवून अत्याचार; नाशिकमध्ये दोघांना बेड्या

काळजाचा थरकाप उडवणाऱ्या राज्यातील बलात्काराच्या घटना थांबता थाबत नाहीयत. नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या सिन्नरमध्ये तर एका अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीवर (minor girl) बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.

धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन मुलाचा बलात्कार, अश्लील व्हिडिओ दाखवून अत्याचार; नाशिकमध्ये दोघांना बेड्या
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Sep 25, 2021 | 5:41 PM
Share

नाशिकः काळजाचा थरकाप उडवणाऱ्या राज्यातील बलात्काराच्या घटना थांबता थाबत नाहीयत. नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या सिन्नरमध्ये तर एका अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीवर (minor girl) बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. (Rape of a minor girl by a minor boy, atrocities by showing pornographic videos)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सचिन सोमनाथ म्हस्के (वय 22, रा. सिन्नर) हा गेल्या दोन वर्षांपासून एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करायचा. त्याने तिला एकांतात भेटण्यासाठी बोलावले होते. मुलीने त्याचे म्हणणे ऐकले नाही म्हणून अनेकदा धमकावलेही. त्यानंतर त्याने पीडितेची ओळख एका अल्पवयीन मुलासोबत करून दिली. या अल्पवयीन मुलाने 6 सप्टेंबर रोजी अल्पवयीन मुलीला बसस्थानकासमोरील कॅफेमध्ये भेटायला बोलावले. तिथे मोबाइलमधील अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार कुणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. या घटनेची माहिती सचिनला कळाली. त्यानेही मुलीकडे शरीर सुखाची मागणी करत ब्लॅकमेल करणे सुरू केले. यानंतर मुलीने घडला प्रकार आपल्या घरी सांगितला. शेवटी तिच्या वडिलांनी सिन्नर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी सचिनला गुरुवारी रात्री बेड्या ठोकल्या आहेत, तर दुसऱ्या अल्पवयीन आरोपीविरुद्ध बाल न्यायालयात खटला चालवला जाणार आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुदर्शन आवारी करत आहेत.

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणात आतापर्यंत 33 आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. यामधील 28 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर पाच आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. कालपर्यंत 26 जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यामुळे डोंबिवलीतील अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या 28 वर गेली आहे. यामधील आरोपी नवी मुंबई, डोंबिवली येथे राहणारे असल्याची माहिती एसपी सोनाली ढोले यांनी दिली.

कल्याणमध्ये चिमुकलीवर अत्याचार

दरम्यान, डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना ताजी असताना कल्याणमध्ये देखील एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका शिकवणी चालविणाऱ्या शिक्षकाने अवघ्या 8 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडितेच्या आईने बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर संबंधित प्रकार उघड झाला. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आरोपी मुदर तालवाला याला अटक केली. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

इतर बातम्याः

भाजप विरुद्ध भाजप; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये रंगला सामना

अन् मरणाच्या दारातून परतलो; जळगावच्या ओबीसी परिषदेत भुजबळांनी सांगितली दुखरी आठवण!

नाशिक जिल्ह्यात 20 टक्के शिक्षक कोरोना लसीविनाच; अन् शाळा होतायत सुरू!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.