AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवरीही गेली, पैसेही गेले; ‘नवरी मिळे नवऱ्याला’ संस्थेचा उतावीळ नवरोबांना लाखोंचा गंडा

लग्न जुळत नाही म्हणून अनेक तरुण विवाह जुळवणाऱ्या संस्थांकडे धाव घेतात. (Online matrimonial fraud: marriage beuro cheats 17 youth in maharashtra)

नवरीही गेली, पैसेही गेले; 'नवरी मिळे नवऱ्याला' संस्थेचा उतावीळ नवरोबांना लाखोंचा गंडा
| Updated on: Dec 29, 2020 | 6:29 PM
Share

पंढरपूर: लग्न जुळत नाही म्हणून अनेक तरुण विवाह जुळवणाऱ्या संस्थांकडे धाव घेतात. या संस्थेत नाव नोंदवल्यानं मनासारखं स्थळ मिळेल… संसार थाटला जाईल… अशी आशा अनेक तरुणांना असते. अनेक चांगल्या संस्था या तरुणांची स्वप्न प्रत्यक्षात उतरवतातही. पण काही संस्थांकडून विवाह इच्छुकांना दगा फटका झाल्याचंही अधूनमधून कानावर आदळत असतं. मुंबईतील ‘नवरी मिळे नवऱ्याला’ या संस्थेनेही राज्यातील तरुणांना दगा फटका केल्याची धक्कायदायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे नवरीही गेली अन् पैसेही गेले, अशी अवस्था या तरुणांची झाली आहे. (Online matrimonial fraud: marriage beuro cheats 17 youth in maharashtra)

मुंबईतील ‘नवरी मिळे नवऱ्याला’ या विवाह संस्थेतील राजन पाटील आणि सचिन बनसोडे यांची पंढरपुरातील शहाजी शिंदे यांच्याशी सोशल मीडियाद्वारे ओळख झाली होती. त्यानंतर राजन पाटील यांनी शहाजी शिंदे यांना एक ऑफर दिली. पैशाचे आणि नोकरीचे आमिष दाखवून विवाह इच्छुकांकडून पैसे घेऊन त्यांची विवाह नोंदणी करण्यास पाटील यांनी शिंदे यांना सांगितले. त्यानुसार शहाजी शिंदे यांनी त्यांच्या पंढरपुरातील सुस्ते गावातील विवाह इच्छुक शाम शिंदे याला या संस्थेची माहिती देऊन विवाह नोंदणी करायला सांगितली. तसेच लग्नासाठी तयार असलेल्या मुलींचे फोटोही शाम यांना दाखवले आणि या मुलींचे मोबाईल नंबर देऊन त्यांच्याशी बोलणंही करून दिलं. मुलींचा फोन मिळाल्याने शाम यांनीही मुलींशी बोलणं सुरू केलं. या दरम्यान, शाम यांनी त्याच्या विवाह इच्छुक चार मित्रांनाही या मुलींचे नंबर देऊन त्यांच्याशी बोलणं करून दिलं. या मुलींनी शाम यांना फोन करून लग्नासाठी लागणारे साहित्य, कपडे, सोने आदींसाठी पैशाची मागणी केली. त्यामुळे शाम याने त्याच्या चार मित्रांचे मिळून असे दोन लाख रुपये या मुलींच्या नावावर फोन पेवरून ट्रान्स्फर केले.

मित्रंही फसले

पैसे मिळाल्यानंतर विवाह नोंदणी करणाऱ्या या संस्थेने या शाम यांच्यासह त्यांच्या चारही मित्रांना नोव्हेंबर महिन्यातील विवाहाची तारीख दिली. विवाहाची तारीख उलटून गेल्यानंतर शाम यांनी राजन पाटील यांच्याकडे फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा फोन बंद असल्याने संपर्क झाला नाही. त्यानंतरही शाम यांनी संबंधित संस्थेकडे वारंवार संपर्क केला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच शाम शिंदे यांनी मध्यस्थी असलेल्या शहाजी शिंदे यांच्याकडे पैशासाठी तगादा लावला. हा फसवणुकीचा प्रकार असल्याचं शहाजी यांच्याही लक्षात आल्यानंतर त्यांनी शाम आणि फसवणूक झालेले प्रकाश चव्हाण यांना घेऊन तक्रार दाखल केल्याचं तालुका पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी सांगितलं.

17 तरुणांची फसवणूक

पोलिसांनी या प्रकरणाची शहानिशा केली असता नवरी मिळे नवऱ्याला या संस्थेने सोलापूरसह राज्यातील सुमारे 17 तरुणांची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संस्थेने आतापर्यंत 6 लाख 66 हजार रुपयांची फसवणूक केली असल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे विवाह इच्छुक तरुणांनी कोणत्याही अमिषाला बळी पडू नये. सोशल मीडियातून किंवा फोन कॉलवरून कुणीही पैसे मागितल्यास देवू नये, असं आवाहन पंढरपूर तालुका पोलिसांनी केलं आहे. (Online matrimonial fraud: marriage beuro cheats 17 youth in maharashtra)

संबंधित बातम्या:

लग्नाच्या चार दिवसांनी नवरी म्हणाली, मी तर पोळ्या लाटण्यासाठी आले होते; जबरदस्तीने लग्न लावलं!

आरोपी बाळ बोठेचा पाय आणखीनच खोलात, सुपारी, हत्येनंतर आणखी एक गुन्हा

50 लहान मुलांचे लैंगिक शोषण, पॉर्न व्हिडीओंची विक्री, ज्युनिअर इंजिनीअरच्या पत्नीला अटक

(Online matrimonial fraud: marriage beuro cheats 17 youth in maharashtra)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.