रक्तरंजित नदी… ‘त्या’ सात जणांना बेशुद्ध करण्यापूर्वी काय केलं? घरचाच भेदी बनला काळ; पुण्याच्या हत्याकांडातील काळीबाजू काय?

पुण्यातील यवत गावाच्या बाहेरच्या परिसरात भीमा नदीवर परगाव पूलाजवळ सोमवारी 4 आणि मंगळवारी 3 जणांचे मृतदेह सापडले होते. सर्व मृतदेह एकमेकांच्या 200 ते 300 मीटरच्या अंतरावर सापडले होते.

रक्तरंजित नदी... 'त्या' सात जणांना बेशुद्ध करण्यापूर्वी काय केलं? घरचाच भेदी बनला काळ; पुण्याच्या हत्याकांडातील काळीबाजू काय?
policeImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 25, 2023 | 1:18 PM

पुणे: आजची सकाळ पुणेकरांसाठी अत्यंत धक्कादायक आणि हादरवून टाकणारी ठरली. एकाच कुटुंबातील सात जणांची हत्या झाली. सुरुवातीला ही आत्महत्या असल्याचं वाटत होतं. पोलिसांनीही तसा दावा केला होता. पण नंतर पोलिसांनी अवघ्या काही तासात या प्रकरणाचं सत्य बाहेर आणलं. त्या रक्तरंजित नदीत सात लोकांनी आत्महत्या केली नाही तर त्यांची हत्या करण्यात आली. घरच्याच भेदीने हे कृष्णकृत्य केलं. चुलत भावानेच जुन्या वैरातून सात जणांची हत्या घडवून आणली आणि आत्महत्येचा बनाव केला.

पुण्याच्या दौंड तालुक्यातील भीमा नदीत एक आठवड्यापूर्वी एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळून आले होते. पोलिसांनी सुरुवातीला तपास करून ही आत्महत्या असल्याचं सांगितलं. या कुटुंबातील मुलीचे गावातील मुलाशी प्रेम होते. त्यामुळे दोघेही गायब झाले होते. त्यामुळेच या कुटुंबातील सात जणांनी आत्महत्या केली असल्याचं पोलिसांचं म्हणणं होतं.

हे सुद्धा वाचा

पराकोटीच्या द्वेषातून…

परंतु पोलिसांनी जसजसा या प्रकरणाचा खोलवर तपास केला. तस तसं त्यांना नवी माहिती मिळाली. या सात जणांनी आत्महत्या केली नसून त्यांची हत्या झाल्याचं पोलिसांनी आढळून आलं. पराकोटीच्या द्वेषामुळे ही हत्या करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. चुलत भावानेच या सातही हत्या केल्याचं तपासात उघड झालं.

महिलेलाही अटक

या हत्या घडवून आणणाऱ्या चुलत भावाला काल रात्री पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासोबत एका महिलेलाही अटक करणअयात आली आहे. काही ओळखीच्या लोकांनी आणि नातेवाईकांनी आधी या सात जणांना काही तरी खायला दिलं. त्यामुळे हे सातजण बेशुद्ध पडले. त्यानंतर त्यांना बेशुद्धावस्थेतच नदीत फेकून देण्यात आल्याचं एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं.

फॉरेन्सिक रिपोर्ट यायचा बाकी

या सातही मृतांच्या अंगावर मार लागल्याच्या कोणत्याच जखमा नव्हत्या. त्यामुळे पोलीस फॉरेन्सिक रिपोर्टची वाट पाहत आहेत. या प्रकरणात आतापर्यंत सहा लोकांना अटक करण्यात आली आहे. एक आरोपी अजूनही फरार आहे.

काय आहे प्रकरण?

पुण्यातील यवत गावाच्या बाहेरच्या परिसरात भीमा नदीवर परगाव पूलाजवळ सोमवारी 4 आणि मंगळवारी 3 जणांचे मृतदेह सापडले होते. सर्व मृतदेह एकमेकांच्या 200 ते 300 मीटरच्या अंतरावर सापडले होते. मोहन पवार, पत्नी संगिता मोहन पवार, मुलगी राणी फलवरे, जावई श्याम पंडित फलवरे आदी मृतांची नावे आहेत. मृतांमध्ये तीन लहान मुलांचाही समावेश आहे.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.