Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारामती हादरली, पोलिसांकडून मोठा खुलासा, 9 वर्षाच्या मुलाला बापानेच…, तिघांवर गुन्हा दाखल

बारामती तालुक्यातील होळ येथे, नऊ वर्षीय पियुष भंडलकर याचा त्याच्या वडिलांनीच अभ्यास करत नाही म्हणून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. वडिलांनी रागाच्या भरात मुलाचे डोकं भिंतीवर आपटून आणि गळा दाबून खून केला. आजी आणि आणखी एका नातेवाईकांनी ही घटना दडवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तीनही आरोपींना अटक केली आहे. ही घटना 14 जानेवारीला घडली असून, वडगाव निंबाळकर पोलिसांनी तपास करून गुन्हा उघड केला.

बारामती हादरली, पोलिसांकडून मोठा खुलासा, 9 वर्षाच्या मुलाला बापानेच..., तिघांवर गुन्हा दाखल
बारामती हादरली, पोलिसांकडून मोठा खुलासा, 9 वर्षाच्या मुलाला बापानेच...
Follow us
| Updated on: Jan 17, 2025 | 5:24 PM

बारामती तालुक्यातील होळ येथील पियुष विजय भंडलकर या नऊ वर्षीय बालकाचा त्याच्याच वडिलांनी मुलगा अभ्यास करत नाही म्हणून रागाच्या भरात भिंतीवर डोकं आपटून आणि गळा दाबून त्याचा खून केलाय. संबंधित घटना ही 14 जानेवारीला दुपारी अडीच वाजता राहत्या घरी घडल्याची माहिती आहे. त्यानंतर हा सर्व प्रकार दडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र वडगाव निंबाळकर पोलिसांनी या खुनाचं रहस्य उलगडत वडील विजय गणेश भंडलकर, मयत पियुषची आजी शालन गणेश भंडलकर आणि संतोष सोमनाथ भंडलकर या तिघांवर वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आजीकडून घटना दडपण्याचा प्रयत्न, दिली खोटी माहिती

वडील विजय भंडलकर यांनी मुलगा पियुष याला तू अभ्यास करत नाही, सारखा बाहेर खेळत असतो, तू तुझ्या आईच्या वळणावर जावून माझी इज्जत घालवणारा दिसतोय, असे म्हणत त्याला हाताने मारहाण केली. राग अनावर झाला अन् त्यांनी त्याचा गळा दाबून त्याला भिंतीवर आपटले यात त्याचा मृत्य झाला. पियुष याची आजी हे सर्व पाहत होती. पण तिने मुलगा विजयला अडवलं नाही. त्यानंतर विजय याच्या सांगण्याप्रमाणे पियुष हा चक्कर येवून पडला आहे, अशी खोटी माहितीही तिने दिली.

हे सुद्धा वाचा

मुलगा चक्कर येवून पडल्याचा बनाव….

संतोष भंडलकर याने डॉ. भट्टड यांच्या दवाखान्यात पियुषला नेल्यानंतर तिथे विजय याच्या सांगण्यावरून पियुष हा चक्कर येवून पडल्याची खोटी माहिती दिली. डॉक्टरांनी पियुष याला होळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेवून जाण्याचा सल्ला दिला. मात्र तिथे न नेता आणि मयताबाबत गावातील पोलीस पाटील अथवा इतर कोणालाही काहीही न सांगत नातेवाईकांना बोलावून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मयताचे शवविच्छेदन न करता थेट अत्यंविधीची तयारी केली. पोलिसांना खबऱ्याकडून ही माहिती समजताच पोलिसांनी अंत्यविधी थांबवत पियुष याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बारामतीला नेला आणि त्यानंतर तपासात बापानेच पियुषची हत्या केल्याचं समोर आलं आहे.

शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.
छेडछाडीला कंटाळून तरुणीने लग्नाच्या आधल्या रात्रीच असं काही केलं की..
छेडछाडीला कंटाळून तरुणीने लग्नाच्या आधल्या रात्रीच असं काही केलं की...
अबब! घराच्या छतावर आकाशातून पडला 50 किलोच धातू
अबब! घराच्या छतावर आकाशातून पडला 50 किलोच धातू.
उद्धव ठाकरेंकडून कोणत्याही अटी नाही; ठाकरे बंधूंच्या युतीवर राऊतांचं
उद्धव ठाकरेंकडून कोणत्याही अटी नाही; ठाकरे बंधूंच्या युतीवर राऊतांचं.
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊत स्पष्टच बोलले
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊत स्पष्टच बोलले.
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची बॅनरबाजी
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची बॅनरबाजी.
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट.
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा.
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत.