AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मॅट्रिमोनी साईटवर सूत जुळलं, साखरपुडा झाला, मग एनआरआय नवरदेवावर गुन्हा दाखल, काय आहे नेमकं प्रकरण

जर पिंपरी पोलीसांनी क्लोजर रिपोर्ट दाखल केला आणि हा गुन्हा रद्द झाला तर तक्रारदार पल्लवी गायकवाडवर खोटा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात अडचणी वाढू शकतात.

मॅट्रिमोनी साईटवर सूत जुळलं, साखरपुडा झाला, मग एनआरआय नवरदेवावर गुन्हा दाखल, काय आहे नेमकं प्रकरण
जिच्यासोबत होणार होतं लग्न तिनेच खोट्या गुन्ह्यात अडकवलं
| Edited By: | Updated on: Nov 05, 2021 | 9:53 PM
Share

पिंपरी : अमेरिकेत राहणाऱ्या मिलिंद बोरकरने मेट्रोमोनी साइटवर मुलीची निवड करून लग्न करण्याचं स्वप्न पाहिलं. पण त्याच स्वप्नांची किंमत त्याला स्वतःवर गुन्हा नोंदवून मोजावी लागली. पुण्याच्या पिंपरीमध्ये राहणाऱ्या पल्लवी चंद्रकांत गायकवाडशी लग्न करण्यासाठी मिलिंद भारतात आला. मात्र थोड्याच दिवसांनी पल्लवीच एका दुसऱ्या पुरुषाबरोबर संबंध असल्याचं त्याला कळलं, इतकंच नाही तर मिलिंदला काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ सुद्धा सापडले. ज्यामुळे त्याने पल्लवी गायकवाडशी लग्न मोडलं, लग्न मोडल्यामुळे पल्लवी गायकवाडने आपल्याला बदनाम करत असल्याचं सांगत मिलिंद बोरकरवर गुन्हा नोंदवला. मात्र आता या प्रकरणात नवीन वळण आलं आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी पोलीस लवकरच या प्रकरणात बी समरी रिपोर्ट म्हणजेच केस क्लोज करण्यासंदर्भातील रिपोर्ट कोर्टात सादर करणार आहेत. तर दुसरीकडे अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को सुपिरियर कोर्टामध्ये सुद्धा या प्रकरणाची सुनावणी महत्वाच्या वळणावर आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्राथमिक तपासात पोलिसांना या केसमध्ये अनेक त्रुट्या आढळल्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच प्रकरणात आधीच दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. अशातच जर पिंपरी पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दाखल केला आणि हा गुन्हा रद्द झाला तर तक्रारदार पल्लवी गायकवाडवर खोटा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात अडचणी वाढू शकतात.

काय आहे प्रकरण ?

2007 साली अमेरिकेतील एका नामांकित कंपनीमध्ये मिलिंद बोरकर काम करत होते. आपल्या करियरमध्ये ओळख आणि कुटुंबाची जबाबदारी पार पाडल्यानंतर मिलिंद बोरकर यांनी भारतात येऊन भारतीय मुलीशी लग्न करण्याचं ठरवलं. 2018 पासून मिलिंद बोरकर यांनी मेट्रोमोनी साइटवर मुली पाहणं सुरू केलं. ज्यानंतर 2019 मध्ये मिलिंद यांना पुण्याच्या पिंपरी मोरवाडी येथे राहणारी पल्लवी गायकवाड नावाची मुलगी पसंत पडली. मेट्रोमोनी साइटवर भेट झाल्यानंतर दोघांचं बोलणं सुरू झालं आणि दोघं एकमेकांच्या जवळ आले. 16 एप्रिल 2019 ला मिलिंद भारतात आले आणि पहिल्यांदा पल्लवीला भेटले. 2 जून 2019 रोजी मिलिंद बोरकर आणि पल्लवी गायकवाड यांचा साखरपुडा झाला. साखरपुड्यानंतर मिलिंद लग्नाच्या तयारीत लागले.

मात्र त्याच दरम्यान पल्लवीचे काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ सापडले, जे पाहून मिलिंदला धक्काच बसला. ज्यानंतर मिलिंदने साखरपुडा मोडला. लावण्यात आलेल्या आरोपानुसार मिलिंदकडे पल्लवीच्या कुटुंबीयांनी पैशाची मागणी केली. मात्र पैसे न मिळाल्यामुळे पल्लवी गायकवाडच्या कुटुंबीयांनी पिंपरीमध्ये मिलिंद बोरकरवर पल्लवीला बदनाम करण्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवला. मिलिंदने सुद्धा अमेरिकेच्या सॅनफ्रान्सिस्को सुपिरियर कोर्टात याचिका दाखल केली. याचिकेनुसार 21 जुलै 2019 ला मिलिंदला पल्लवीच्या अनैतिक संबंधाबाबत कळलं. मिलिंदला पल्लवीचे आक्षेपार्ह फोटोज आणि व्हिडिओ पल्लवीच्या मोबाईलमध्ये सापडले. कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत मिलिंद बोरकरने ते फोटो आणि व्हिडिओ सुद्धा कोर्टात सादर केले आहेत. मिलिंदचा आरोप आहे की, साखरपुडा मोडल्यानंतर पल्लवी मिलिंदला बदनाम करण्यासाठी आणि त्याचं करिअर उध्वस्त करण्यासाठी जाणीवपूर्वक खोटे गुन्हे दाखल करत आहे. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को सुपिरियर कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत मिलिंदने आरोप लावले आहेत की पल्लवीने लग्न झाल्याचं खोटं सांगत मिलिंदच करियर उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. (Girl filed fraud complaint against Future husband after cancel marriage)

इतर बातम्या

आर्यन खान प्रकरणाचा तपास संजय सिंग यांच्याकडे, कोण आहेत संजय सिंग?

VIDEO | कल्याणमध्ये परंपरेच्या नावाखाली बैलांसोबत जीवघेणा खेळ, सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.