आयपीएल सामन्यात रोहित शर्मा बाद झाल्यावर जल्लोष करणाऱ्यास मारहाण, एकाचा मृत्यू

IPL 2024: गंभीर जखमी झालेल्या बंडूपंत तिबिले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचार सुरु असताना तीन दिवसानंतर त्याचा मृत्यू झाला. तिबिले यांच्या मागे पत्नी, तीन मुली, जावई, मुलगा, नातवंडे, भाऊ-बहीण असा मोठा परिवार आहे.

आयपीएल सामन्यात रोहित शर्मा बाद झाल्यावर जल्लोष करणाऱ्यास मारहाण, एकाचा मृत्यू
Follow us
| Updated on: Apr 01, 2024 | 12:15 PM

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीसोबत क्रिकेट प्रेमींसाठी आयपीएलचा थरार सुरु आहे. आयपीएलचे संघ क्रिकेट प्रेमींना आपल्या आवडत्या खेळाडूंनुसार वाटून घेतले आहेत. काही जण मुंबई इडियन्सचे सपोर्टर आहेत. काही जणांना महेंद्रसिंह धोनी याची चेन्नई टीम आवडते. काही जण इतर संघांना सपोर्ट करतात. क्रिकेटचा T- 20 चा थरार आयपीएलमधून मिळत असतो. मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू रोहित शर्मा याचे सपोर्टर खूप आहेत. रोहित शर्मा याला कर्णधारपदावरुन काढल्यानंतर सोशल मीडियावर मुंबई इंडियन्सविरोधात मोहीम सुरु झाली होती. परंतु कोल्हापूर शहरात आयपीएलमुळे एकाचा मृत्यू झाला. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर जल्लोष करणाऱ्या एकाला जबर मारहाण करण्यात आली. त्यात त्याचा मृत्यू झाला.

कशी घडली घटना

कोल्हापूरमधील हणमंतवाडी (ता.करवीर) येथे बुधवारी रात्री ही घटना घडली. बुधवारी २७ मार्च रोजी रात्री दहाच्या सुमारास बंडू तिबिले, सागर झांजगे व बळवंत झांजगे आयपीएलचा सामना पाहत होते. मुंबई इंडियन्सचा सामना सुरु होता. त्यावेळी रोहित शर्मा बाद झाला. बंडूपंत तिबिले यांनी त्याचा आनंद साजरा केला. त्याचा राग सागर झांजगे व बळवंत झांजगे यांना आला. त्यांनी बंडूपंत तिबले यांना दांडक्याने जबर मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या कानातून नाकातून रक्तप्रवाह थांबत नव्हता. त्यात बंडूपंत गंभीर जखमी झाला.

रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू

गंभीर जखमी झालेल्या बंडूपंत तिबिले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचार सुरु असताना तीन दिवसानंतर त्याचा मृत्यू झाला. तिबिले यांच्या मागे पत्नी, तीन मुली, जावई, मुलगा, नातवंडे, भाऊ-बहीण असा मोठा परिवार आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी सागर झांजगे व बळवंत झांजगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, या घटनेमुळे कोल्हापूरमधील क्रिकेट प्रेमींना चांगलाच धक्का बसला आहे. खेळाचा आनंद घेण्याऐवजी एका क्रिकेट प्रेमीची हत्या झाली आहे. यामुळे क्रिकेटचे चाहतेही या प्रकारामुळे नाराज झाले आहेत.

Non Stop LIVE Update
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.