पुण्यात विद्यार्थ्याला मारहाण, 50 हजारांची लूट, बेसबॉल बॅटने कार फोडली

टोळक्यातील एकाने त्यांच्या गाडीतून बेसबॉल बॅट बाहेर काढली. त्यानंतर बॅटने एजाजचं डोकं, पाठ आणि पायांवर मारहाण केली. तर एकाने त्यांच्या गाडीतून बंदूक आणली. त्यामुळे एजाज धावत आपल्या गाडीत जाऊन बसला आणि त्याने दरवाजे लॉक करुन घेतले.

पुण्यात विद्यार्थ्याला मारहाण, 50 हजारांची लूट, बेसबॉल बॅटने कार फोडली
पुण्यात विद्यार्थ्याला मारहाण आणि लूटImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 02, 2022 | 1:15 PM

पुणे : कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण करत लूटमार (Student Loot) केल्याची घटना उघडकीस आली आहे. बंदुकीच्या धाकाने तरुणाच्या कारमधून बॅग हिसकावून टोळक्याने पळ काढला. यामध्ये 50 हजार रुपये असल्याचा दावा पीडित विद्यार्थ्याने केला आहे. पुणे शहरात हडपसर (Hadapsar Pune) भागातील मेगा सेंटरजवळ हा प्रकार घडल्याची माहिती आहे. टोळक्याने आधी आपल्याला मारहाण केली. त्यानंतर गाडी बेसबॉलच्या बॅटने (Baseball Bat) फोडली, असाही आरोप विद्यार्थ्याने केला आहे. बघ्यांची गर्दी जमा झाल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला.

नेमकं काय घडलं?

हडपसर पोलिसांनी शुभम कांबळे आणि तिघा जणांना अटक केली आहे. एजाज पठाण असं पीडित विद्यार्थ्याचं नाव आहे. तो पुण्यात कायदे विषयाचं शिक्षण घेत आहे. त्याचे वडील वकील असून त्यांचं मेगा सेंटरमध्ये कार्यालय आहे. एजाज आपल्या वडिलांना कायदेशीर कामात मदत करतो. घटनेच्या दिवशी तो काम संपवून तिघा सहकाऱ्यांसोबत बेसमेंट पार्किंगमध्ये गेला.

टोळक्याची शिवीगाळ

रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास आरोपी शुभम कांबळे आणि त्याचे मित्र पार्किंग स्पेसमध्ये एजाजच्या गाडीजवळ घुटमळत होते. हे पाहून एजाजने आधीच 50 हजार रुपये असलेली बॅग कारच्या मागच्या सीटखाली ठेवली. त्यानंतर त्याने टोळक्याला आपल्या रस्त्यातून बाजूला होण्याची विनंती केली. यामुळे चिडलेल्या टोळक्याने एजाजला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

बेसबॉल बॅटने मारहाण

टोळक्यातील एकाने त्यांच्या गाडीतून बेसबॉल बॅट बाहेर काढली. त्यानंतर बॅटने एजाजचं डोकं, पाठ आणि पायांवर मारहाण केली. तर एकाने त्यांच्या गाडीतून बंदूक आणली. त्यामुळे एजाज धावत आपल्या गाडीत जाऊन बसला आणि त्याने दरवाजे लॉक करुन घेतले.

आरोपी यावर थांबले नाहीत. त्यांनी बेसबॉल बॅटने एजाजच्या कारची पुढची काच फोडली. आवाज ऐकून अनेक जण तिथे धावत आले. त्यामुळे चौघांनी गाडीतील 50 हजार रुपये असलेली बॅग उचलून घटनास्थळावरुन पोबारा केला. त्यानंतर एजाजने हडपसर पोलिसात तक्रार दाखल केली.

संबंधित बातम्या :

पुण्यात टुरिस्ट गाडी चालवण्याच्या बहाण्याने चालवत होते वेश्या व्यवसाय ; दलालांना अटक

फ्लॅटसाठी माहेरून पैसे न आणल्याच्या रागातून सासरच्या मंडळींनी विवाहितेला पाजले ॲसिड

Video: हायवेवरच बस पेटली, चांदणी चौकातील हायवेवरच बर्निंग बसचा थरार!

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.