CCTV VIDEO | पुण्यात दिवसाढवळ्या गँगवॉर, दोघांचा मृत्यू, गोळीबाराची भीषण दृश्यं सीसीटीव्हीत कैद

पुण्याजवळील उरळी कांचन परिसरात वाळू माफिया संतोष जगताप या गुंडावर झालेल्या गोळीबाराचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे. गँग वॉरमधून दिवसाढवळ्या गोळीबाराची घटना घडली होती. गुंड वाळू माफिया संतोष जगताप याच्यावर गोळीबार झाला होता.

CCTV VIDEO | पुण्यात दिवसाढवळ्या गँगवॉर, दोघांचा मृत्यू, गोळीबाराची भीषण दृश्यं सीसीटीव्हीत कैद
पुण्यात टोळीयुद्धातून गोळीबार

पुणे : पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोरमध्ये गँग वॉरमधून दिवसाढवळ्या गोळीबाराची घटना घडली होती. दोन टोळ्यांमध्ये भर रस्त्यात गोळीबार झाला होता. यात दोघांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहे. या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

काय आहे प्रकरण?

पुण्याजवळील उरळी कांचन परिसरात वाळू माफिया संतोष जगताप या गुंडावर झालेल्या गोळीबाराचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे. गँग वॉरमधून दिवसाढवळ्या गोळीबाराची घटना घडली होती. गुंड वाळू माफिया संतोष जगताप याच्यावर गोळीबार झाला होता.

नेमकं काय घडलं?

बचावासाठी जगताप याच्या अंगरक्षकाने बापूसाहेब खैरे या गुंडावर फायरिंग केली होती, त्याचाही त्या घटनेत मृत्यू झाला. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी इंदापूर जवळून दोघांना ताब्यात घेतलं. शिवाय त्यांच्याकडून पिस्तुल आणि वाहन जप्त केल्याची माहिती आहे.

पाहा व्हिडीओ :

लोणीकंद परिसरात गोळीबाराची पुनरावृत्ती

दरम्यान, पुणे जिल्ह्यात गोळीबाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. लोणीकंद परिसरात गुंडांची दहशत वाढताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यात गोळीबाराच्या अनेक घटना उघडकीस आल्या होत्या. नगर-पुणे हायवेवर अज्ञात इसमांनी सचिन शिंदे या व्यक्तीवर गोळीबार केला होता. दोन राऊंड फायर करत गोळीबार करणारे आरोपी फरार झाले होते.

संबंधित बातम्या :

पुणे नगर हायवेवर दिवसा ढवळ्या गोळीबार, लोणीकंद परिसरात भीतीचं वातावरण

जुनं भांडण पुन्हा नव्याने उकरलं, दोन गट आपसांत भिडले, तडीपार गुंडांकडून हत्या, नाशिकमध्ये खळबळ

प्रियकराच्या साथीने पतीची हत्या, पोलिसांनी पाच महिन्यांनी प्रेमी युगुलाला पकडलं

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI