AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पिंपरी-चिंचवडमध्ये हॉटेल चालकाकडून खंडणी उकळणारा पोलीस अधिकारी निलंबित

Police Suspended | मिलन कुरकुटे असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक मिलन कुरकुटे सध्या शहर पोलीस आयुक्तालयात कार्यरत होता. त्याने मुंढवा परिसरातील हॉटेल कार्निवलच्या मालकाकडून पैशांची मागणी केली होती.

पिंपरी-चिंचवडमध्ये हॉटेल चालकाकडून खंडणी उकळणारा पोलीस अधिकारी निलंबित
| Edited By: | Updated on: Aug 26, 2021 | 10:27 AM
Share

पिंपरी-चिंचवड: पुण्यातील पिंपर-चिंचवड परिसरात एका हॉटेल चालकाकडून खंडणी उकळणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही संबंधित अधिकारी लाचखोरीच्या प्रकरणात अडकला होता. मात्र, त्यानंतरही या पोलीस अधिकाऱ्याचे गैरप्रकार सुरुच होते. अखेर त्याच्यावर दुसऱ्यांदा निलंबनाची कारवाई झाली आहे.

मिलन कुरकुटे असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक मिलन कुरकुटे सध्या शहर पोलीस आयुक्तालयात कार्यरत होता. त्याने मुंढवा परिसरातील हॉटेल कार्निवलच्या मालकाकडून पैशांची मागणी केली होती. पोलिसांचा गणवेश घालूनच मिलन कुरकुटे हॉटेलमध्ये गेला होता. हा सगळा प्रकार हॉटेलमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. याआधारे मिलन कुरकुटे याच्यावर कारवाई करण्यात आली.

काही दिवसांपूर्वीच मिलन कुरकुटेला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्यानंतर मिलनची बदली आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात करण्यात आली होती. निलंबनाचा कालावधी संपल्यानंतर तो पुन्हा सेवेत रुजू झाला होता. मात्र, मध्यंतरी मिलन कुरकुटे काहीवेळ आजारपणाच्या सुट्टीवर होता. त्यावेळी त्याने हॉटेल कार्निवलमध्ये जाऊन पैशांची मागणी केली. त्यामुळे आता कुरकुटे दुसऱ्यांदा निलंबित झाला आहे. संबंधित बातम्या:

ठाण्यात शिवसेना विभागप्रमुखावर जीवघेणा हल्ला, श्रीरंग सोसायटी शाखेतच चाकूने वार

#क्राईम_किस्से : मुंबईतल्या प्रसिद्ध बिल्डरच्या मुलाशी आधी दोस्ती, किडनॅप करत 2 लाखांची खंडणी, नंतर थेट हत्या

दागिने बनावटीचे, पण गुन्हा गंभीर, आजीबाईच्या गळ्यातील चैन हिसकावून चोरटे पसार

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.