पुणे सोलापूर महामार्गावर चोर पोलिसांमध्ये सिनेस्टाईल थरार, 60 किमी चोरांचा पाठलाग, डिझेलचोर ट्रक सोडून पळाले!
पुणे सोलापूर महामार्ग बुधवारी (दि.11) रात्री पोलीस आणि डिझेल चोरांमध्ये सिनेस्टाईल थरार पाहायला मिळाला. पोलिसांनी तब्बल 60 किमीच्या आसपास चोरांचा पाठलाग केला. परंतु पोलिसांच्य आक्रमक पवित्र्यानंतर डिझेल चोर ट्रक सोडून पसार झाले.

इंदापूर (पुणे) : पुणे सोलापूर महामार्ग बुधवारी (दि.11) रात्री पोलीस आणि डिझेल चोरांमध्ये सिनेस्टाईल थरार पाहायला मिळाला. पोलिसांनी तब्बल 60 किमीच्या आसपास चोरांचा पाठलाग केला. परंतु पोलिसांच्य आक्रमक पवित्र्यानंतर डिझेल चोर ट्रक सोडून पसार झाले. याप्रकरणी इंदापूर पोलिसांनी 10 लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. इंदापूर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई विठ्ठल धोंडीराम नलवडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमका काय प्रकार घडला?
डिझेल चोरी करुन पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला ओव्हरटेक करून थांबविण्याचा प्रयत्न पोलिस करत होते. यावेळी चालकाने ट्रक भरधाव वेगाने चालवून पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या थरारात पोलिसांचं वाहन बाजूला गेले. नंतर पुन्हा पोलिसांनी पाठलाग सुरू केला असता चालक सर्व्हिस रोडने ट्रक घेऊन भिगवणमार्गे पुढे निघाला. तेव्हा भिगवण ते डिकसळ गावा दरम्यान रस्त्यावर ट्रकमध्ये चालकासोबत असलेल्या साथीदाराने ट्रकच्या पाठीमागील बाजूस येऊन ट्रकमधील डिझेल ड्रम, डिझेल, टायर पोलिसांच्या दिशेने फेकून मारले.
त्यानंतर काही अंतर पुढे गेल्यानंतर रेल्वे रुळाचे गेट आडवे आल्याने चालकाने ट्रक भरधाव वेगाने चालवून रेल्वे फाटक तोडून रेल्वेच्या मालमतेचे नुकसान करून पुढे निघून गेला. सदर ट्रक चालक व त्याच्या साथीदार ट्रक रस्त्यावर लावून पळून गेले. सदरील घटनास्थळावरुन पोलिसांनी 10 लाख रुपये किंमतीचा दहा टायर ट्रक व इतर समान असे एकूण 10 लाख 28 हजार 850 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
औरंगाबादच्या माळीवाड्यात भर दिवसा पेट्रोल पंपार दरोडा
औरंगाबाद जिल्ह्यातील माळीवाडा येथे भर दिवसा पेट्रोल पंपावर दरोडा पडला. भरदिवसा सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारासची ही घटना आहे. पैशांची मोजणी सुरु असलेली रक्कम घेऊन दरोडेखोर पसार झाले.
नेमकं काय झालं?
सकाळी दडा-साडे दहा वाजण्याच्या सुमारास पेट्रोल पंपावर कॅश मोजण्याचं काम सुरु होतं. त्याचवेळी दरोडेखोर पेट्रोल पंपावर आले. तोंड बांधून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी हा दरोडा टाकला. यावेळी त्यांनी मोजणी चालू असलेली रक्कम घेऊन पोबारा केला.
सविस्तर माहिती अशी की, सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पेट्रोल पंपावरील कर्मचारी रक्कम मोजत होते. यावेळी दोन अज्ञात व्यक्ती तोंड बांधून आले. त्यांनी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना पिस्तुल आणि चाकूचा धाक दाखवत दरोडा टाकला. भरदिवसा सकाळी साडेदहा वाजता ही घटना घडली. भर दिवसा पडलेल्या धाडशी दरोड्यामुळे परिसरासह औरंगाबादमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहे.
(Pune Solapur National highway Cinestyle thrill in Thief Police)
हे ही वाचा :
आमच्या गाडीला कट का मारला? चाकणमध्ये वादात गुंतवून कारमधील 12 लाखांची चोरी
परदेशातून कुटुंबाला भेटायला वसईत, वॉकिंग करताना मद्यधुंद दुचाकीस्वाराच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
