Pimpari Crime : पिंपरी चिंचवडमध्ये कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला

मुळा नदीत एक मृतदेह आढळल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह चार ते पाच महिन्यापूर्वीचा असल्याने पूर्णतः सडला आहे. मृतदेहाच्या अंगावरील कपड्यांवरुन तो महिलेचा मृतदेह असल्याचे कळते.

Pimpari Crime : पिंपरी चिंचवडमध्ये कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला
पिंपरी चिंचवडमध्ये कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळलाImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Mar 31, 2022 | 1:23 AM

पिंपरी : हिंजवडीत मुळा नदीत चार महिन्यापूर्वीचा कुजलेल्या (Decomposed) अवस्थेतील मृतदेह (Deadbody) आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा मृतदेह महिलेचा असल्याचे हिंजवडी पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. अंगावर गाऊन परिधान केल्यान तो महिलेचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले आहे. अंदाजे चार ते पाच महिन्यांपूर्वीच महिलेचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. प्रथमदर्शनी आत्महत्या केल्याचं दिसून येत आहे. मात्र तसा कोणताही पुरावा तिथं आढळून येत नाहीये. त्यामुळे ही हत्या असावी अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. याबाबत अधिक तपास हिंजवडी पोलीस करत आहेत. (The body was found in Mula river in Pimpri Chinchwad)

हत्या की आत्महत्या ?

मुळा नदीत एक मृतदेह आढळल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह चार ते पाच महिन्यापूर्वीचा असल्याने पूर्णतः सडला आहे. मृतदेहाच्या अंगावरील कपड्यांवरुन तो महिलेचा मृतदेह असल्याचे कळते. ही हत्या आहे की आत्महत्या ? याबाबत हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

पालघरमध्ये जमिन आणि पैशाच्या वादातून इसमाची हत्या

जमिन व्यवहार व पैशाच्या वादातून 43 वर्षीय इसमाची हत्या केल्याची धक्कादायक घटना पालघरमधील डहाणूमध्ये घडली आहे. गिरीश जयंतीलाल पटेल असे हत्या करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी तलासरी पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तलासरी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या काही तासात दोन आरोपींना ताब्यात घेतले. याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत.

ठाण्यात सेप्टिक टॅंक साफ करताना दोघांचा गुदमरून मृत्यू

मुंब्रा येथील ग्रेस स्वेअर सोसायटीमध्ये सेप्टिक टँक साफ करण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा टाकीतील विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सूरज मढवी (22) आणि हनुमंत गडवा (26) असे या मृत्यू झालेल्या दोन जणांची नावे आहेत. हे दोघेही ठाणे महापालिकेतील ठेकेदाराकडे कंत्राटी कामगार आहेत. काम संपवून दुपारी 3 वाजता सुट्टी झाल्यानंतर चार पैसे जास्त कमावण्यासाठी खाजगी काम करत होते. काल हे दोघेही ग्रेस स्वेअर सोसायटीच्या सेप्टिक टँकची साफसफाई करण्यासाठी गेले असता सेप्टिक टँकमधील विषारी वायुमुळे गुदमरून ते दोघेही बेशुद्ध पडले. दोघांनाही मुंब्रा येथील प्राईम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. (The body was found in Mula river in Pimpri Chinchwad)

इतर बातम्या

Mumbai Fraud : कर्ज देण्याच्या बहाण्याने लोकांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

Palghar Murder : पालघरमध्ये जमिन आणि पैशाच्या वादातून इसमाची हत्या

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.