AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune : महाराष्ट्रासह गुजरातमध्ये स्फोट घडवण्याचा रचला कट, दहशतवाद्यांनी पुण्यात घेतले बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण,

पुणे दहशतवादी अटक प्रकरणात महत्वाचे अपडेट समोर आले आहेत. NIA च्या तपासातून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. पुण्यातील कोंढवा येथील एका घरात बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण संशयित दहशतवाद्यांनी घेतले. मागच्या वर्षी ज्या दहशतवाद्यांना अटक करण्यात आली, त्यांची कसून चौकशी करण्यात आली असता, त्यातून ही धक्कादायक माहिती समोर आली

Pune :  महाराष्ट्रासह गुजरातमध्ये स्फोट घडवण्याचा रचला कट, दहशतवाद्यांनी पुण्यात घेतले बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण,
| Edited By: | Updated on: Mar 15, 2024 | 9:03 AM
Share

पुणे | 15 मार्च 2024 : पुणे दहशतवादी अटक प्रकरणात महत्वाचे अपडेट समोर आले आहेत. NIA च्या तपासातून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. पुण्यातील कोंढवा येथील एका घरात बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण संशयित दहशतवाद्यांनी घेतले. मागच्या वर्षी ज्या दहशतवाद्यांना अटक करण्यात आली, त्यांची कसून चौकशी करण्यात आली असता, त्यातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. NIA च्या तपासात ही खळबळजनक माहिती उघड झाली.

पुणे ISIS शस्त्रास्त्रे आणि स्फोटके जप्त केल्याप्रकरणी NIA बुधवार (13 मार्च) पहिले पुरवणी आरोपपत्र दाखल केले. मागच्या वर्षी दोन दहशतवाद्यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. NIA या प्रकरणाचा तपास करत आहे. NIA कडून याप्रकरणी आणखी चार दहशतदादांच्या विरोधात मुंबई विशेष न्यायालयात पूर्व आणि आरोपपत्र दाखल केले.

सर्व आरोपी बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचे सदस्य असून ते दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देत असल्याचे एनआयएच्या तपासात समोर आले आहे. पुणे आणि महाराष्ट्रात दहशत पसरवण्याच्या मोठ्या कटात हे सर्व सामील होते. या आरोपींनी कोंढवा भागातील घरात राहू बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतले. ते महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये दहशतवादी हल्ले घडवण्याचा कट रचत होते. त्यांनी आयईडी बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतले आणि नियंत्रित स्फोटही घडवून आणला होता. आरोपींनी ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ले घडवण्याचा कट रचला होता त्या ठिकाणांचा शोध घेतला होता. महाराष्ट्र आणि गुजरातमधील विविध महानगरांमध्ये गुन्हे करण्याचा आरोपींचा कट होता, अशी धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे.

दोन जणांच्या अटकेनंतर प्रकरण उघड

मागच्या वर्षी दोन दहशतवाद्यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर या दोन दहशतवाद्यांच्या चौकशीत बॉम्बस्फोटात बदल धक्कादायक माहिती उघड झाली. NIA कडून याप्रकरणी आणखी चार दहशतवाद्यांच्या विरोधात मुंबई विशेष न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. यामुळे प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.