AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saksham Tate Murder : सक्षम ताटे प्रकरणात मोठी अपडेट, आता लोकसभेत पडसाद उमटणार, महाराष्ट्राबाहेरचा हा खासदार लोकसभेत प्रश्न मांडणार

नांदेडमधील आंतरजातीय प्रेमातून सक्षम ताटे या १९ वर्षीय तरुणाच्या निर्घृण हत्या प्रकरणाने राज्य हादरले. प्रेयसी आचलच्या वडील आणि भावांनी त्याची हत्या केली. आचलने सक्षमच्या मृतदेहाशी विवाह करून न्याय मागितला. आता खासदार चंद्रशेखर आझाद हे प्रकरण लोकसभेत मांडणार आहेत, ज्यामुळे या ऑनर किलिंग घटनेवर देशभरात चर्चा होणार आहे.

Saksham Tate Murder : सक्षम ताटे प्रकरणात मोठी अपडेट, आता लोकसभेत पडसाद उमटणार, महाराष्ट्राबाहेरचा हा खासदार लोकसभेत प्रश्न मांडणार
सक्षम ताटे मृत्यू प्रकरण
| Updated on: Dec 04, 2025 | 12:15 PM
Share

दुसऱ्या जातीतल्या तरूणावर लेकीचं प्रेम होतं, पण ते न पटल्याने वडील आणि भावांनी मिळून त्याच तरूणाचा खून केला. आधी त्याच्यावर गोळ्या झाडल्या, नंतर त्याच्या डोक्यात दगड हाणून त्याचा जीव घेतला. नांदेडमध्ये गेल्या आठवड्यात घडलेल्या ऑनर किलींगच्या या घटनेने संपूर्ण राज्य हादरलं. सक्षम ताटे (Saksham Tate ) असं मृत तरूणाचं नाव असून तो अवघ्या 19 वर्षांचा होता. सक्षम यांचं आचल मामीडवार हिच्यावर प्रेम होतं. मात्र तिचे भाऊ आणि वडिलांना हे मान्य नव्हतं, अखेर त्यांनी त्याचा जीव घेतला. मात्र यामुळे शोकाकुल झालेल्या आचलने सर्वांसमोरच सक्षमच्या मृतदेहाशी लग्न केलं. माझ्या बाबांना आणि भावाला फआशी द्या, सक्षमला न्याय मिळवून द्या अशी मागणी तिने केली असून आता ती सक्षम याच्या घरी, त्याच्या कुटुंबियांसोबतच रहात आहे.

दरम्यान या प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. अख्ख्या महाराष्ट्राला हादरवणाऱ्या या प्रकरणाचे पडसाद आता लोकसभेतही उमटणार आहेत.महाराष्ट्राबाहेरचा एक खासदार हा प्रश्न लोकसभेत मांडणार असल्याचे समजते.

हा खासदार लोकसभेत प्रश्न मांडणार; कुटुंबीयांशी साधणार फोनवर संवाद

सक्षम ताटे याच्या निर्घृण खुनामुळे कुटुंबीय शोकाकुल असून त्याला मारणाऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशीच त्यांची मागणी आहे. त्यातच आता एक नवी अपडेट समोर आल आहे. हे प्रकरण आता लोकसभेत पोहोचमार आहे. कारण – आजाद समाज पार्टीचे अध्यक्ष खासदार चंद्रशेखर आझाद हे याप्रकरणी आवाज उठवणार आहेत. चंद्रशेखर आझाद हे आज सक्षम ताटे यांच्या कुटुंबीयांशी व्हिडिओ कॉलवरून संवाद साधणार आहेत. ते आचल मामीडवार व ताटे कुटुंबियांकडून संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेणार आहेत. त्यानंतर चंद्रशेखर आजाद हे सक्षम ताटे हत्या प्रकरणाचा मुद्दा सभागृहात उपस्थित करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संपूर्ण देशापर्यंत ऑनर किलींगच्या या घटनेची माहिती जाणार आहे. लोकसभेत आता यावर काय चर्चा होते, हे पाहणं महत्वाचं ठरेल.

तीन वर्षांपासून होते प्रेमसंबंध

सक्षम ताटे आणि आंचल मामीडवार यांच्यात गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. सक्षम हा आचलच्या भावाचा मित्र होता, त्यातूनच त्यांची ओळख झाली आणि मैत्रीचे नंतर प्रेमात रूपांतर झालं. मात्र आंचलच्या कुटुंबाला हे नाते मान्य नव्हते कारण ते दोघे वेगवेगळ्या जातीचे होते. आचलचे वडीस गजानन आणि भाऊ हिमेश व साहिल मामीडवरा यांना हे नातं मान्य नव्हतं, त्यांनी वेळोवेळी सक्षम-आचलला दूर होण्याास सांगितलं होतं. या तिघांनीच सक्षमची हत्या केल्याचे आचनलने पोलिसांना सांगितलं होतं. मात्र सक्षम गेल्यावरी आचलं प्रेम कमी झालं नाही, तिने सर्वांसमोरच त्याच्या पार्थिवाला हळद-कुंकू लावलं, त्याच्या नावाचं मंगळसूत्र घालत, सक्षमशी लग्न केलं. त्याने माझी साथ सोडली नाही मी त्याला कसं सोडून असं म्हणत तिने सक्षमच्या कुटुंबासोबतच राहणार असल्याचं सांगितलं. सक्षमच्या आईनेही आचलची शेवटपर्यंत साथ देण्याचा निर्णय जाहीर केला. मी तिला मुलगी नव्हे, माझा मुलगा, माझा सक्षम मानणार, असं त्या म्हणाल्या होत्या.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.