AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sangli JCB : ATM चोरीसाठी चक्क JCB घुसवला! ATM मशिनही उखाडलं, सांगलीतला नादखुळा Video

ही घटना शनिवारी मध्यरात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास घडली.

Sangli JCB : ATM चोरीसाठी चक्क JCB घुसवला! ATM मशिनही उखाडलं, सांगलीतला नादखुळा Video
चक्क जेसीबीनं चोरीImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Apr 24, 2022 | 7:23 AM
Share

सांगली : पश्चिम महाराष्ट्रातील सांगली (Miraj Sangli Crime) जिल्ह्यातून ‘नाद खुळा’ बातमी समोर आली आहे. चक्क जेसीबीनं एटीएमची चोरी (ATM theft by JCB) करण्यात आली आहे. थेट जेसीबीच्या मदतीनं चोरांनी एटीएम फोडलं. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये (CCTV Video) एटीएमचा काचेचा दरवाजा जेसीबीच्या मदतीनं फोडून एटीएम चोरी करण्यात आल्याची घटना दिसून आली. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील ही घटना आहे. मिरच्या आरग येथे चक्क जेसीबी आणला आणि ॲक्सिस बँकेचे एटीएम (Axis Bank ATM) फोडण्यात आलं. चोरीचा हा अजब प्रकार पाहून पोलिसही चक्रावून गेले. तर गावातही मोठी खळबळ उडाली. ही घटना शनिवारी मध्यरात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, या घटनेचं सीसीटीव्ही आता समोर आलंय. या सीसीटीव्हीत एक माणूस आत एटीएमच्या आत जातो. त्यानंतर तो बाहेर पडतो. अचानक जेसीबीच थेट एटीएममध्ये शिरल्याचंही दिसून आलं.

एक्सिस बँकेच्या एटीएममध्ये 27 लाखांची रोख (Cash) रक्कम होती. मात्र चोरटे रक्कम न घेताच पसार झाले. ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. मध्य रात्रीच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. मात्र एटीएमच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरा आणि सुरक्षारक्षकाचा अभाव आहे. यामुळेच चोरट्यांना आयती संधी मिळाली. आरोपींचा शोध घेत त्यांना अटक करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत.

पाहा व्हिडीओ :

चोरीच्या जेसीबीनंच एटीएम फोडलं

ज्या जेसीबीनं एटीएम फोडण्यात आला, तो जेसीबीही चोरीचाच होता. चोरलेला जेसीबी लक्ष्मीवाडी रोडवर सकाळी आढळून आला आहे. आरगच्या ग्रामपंचायत कार्यालय परिसरातील आरग पोलीस मदत केंद्र शेजारी ॲक्सिस बँकेचे एटीएम आहे. मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास एका पेट्रोल पंपावर उभे असलेला जेसीबी चोरट्यांनी चोरी करून नेला. गावातील ॲक्सिस एटीएम केंद्राजवळ आणला आणि जेसीबीच्या साह्याने एटीएम सेंटर फोडले.

पुढे जेसीबीच्या मदतीने एटीएम मशीन उचलून सेंटरच्या बाहेर घेतलं. पुन्हा जेसीबी एटीएमच्या मशीनवर जोरदार आदळला. जेसीबीचा मारा इतका जोरदार होता की एटीएम मशीनचे 3 तुकडे झाले. यानंतर परिस्थितीचा अंदाज घेता चोरट्यांनी एटीएम मशीन 50 मीटर अंतरावर टाकून दिलं. रक्कमही तिथेच सोडली. आणि जेसीबी घेऊन पळ काढला.

पाहा व्हिडीओ :

उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात, सूर्याजी पिसाळशी केली गद्दारीची तुलना
उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात, सूर्याजी पिसाळशी केली गद्दारीची तुलना.
आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात बंड कायम; उमेदवारानं अर्ज मागे नाहीच
आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात बंड कायम; उमेदवारानं अर्ज मागे नाहीच.
'तपोवनमधील झाडं तोडणार, असं बोलणाऱ्या मंत्र्याचा माज उतरवायचाय...'
'तपोवनमधील झाडं तोडणार, असं बोलणाऱ्या मंत्र्याचा माज उतरवायचाय...'.
अर्ज गिळणाऱ्या उमेदवाराची माघार, उमेदवाराला अश्रू अनावर; शिंदे म्हणाले
अर्ज गिळणाऱ्या उमेदवाराची माघार, उमेदवाराला अश्रू अनावर; शिंदे म्हणाले.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीला ऊत
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीला ऊत.
हरिभाऊ राठोड यांच्यासोबत वाद अन् व्हायरल व्हिडीओवर नार्वेकरांचा खुलासा
हरिभाऊ राठोड यांच्यासोबत वाद अन् व्हायरल व्हिडीओवर नार्वेकरांचा खुलासा.
नाशकात हायव्होल्टेज ड्रामा, बंडखोर उमेदवाराला कार्यकर्त्यांनी कोंडलं
नाशकात हायव्होल्टेज ड्रामा, बंडखोर उमेदवाराला कार्यकर्त्यांनी कोंडलं.
तो बदनाम माणूस, त्याला मतदान करू नका, इच्छुक नाराज उमेदवारांचा गोंधळ
तो बदनाम माणूस, त्याला मतदान करू नका, इच्छुक नाराज उमेदवारांचा गोंधळ.
राहुल नार्वेकर-हरिभाऊ राठोड यांच्यात बाचाबाची, कारण काय? Video व्हायरल
राहुल नार्वेकर-हरिभाऊ राठोड यांच्यात बाचाबाची, कारण काय? Video व्हायरल.
कल्याण-डोंबिवलीत महायुतीचे 9 उमेदवार नगरसेवक, कोणाचे किती बिनविरोध?
कल्याण-डोंबिवलीत महायुतीचे 9 उमेदवार नगरसेवक, कोणाचे किती बिनविरोध?.