Maharashtra Election News LIVE : अजित पवारांवरील घोटाळ्याच्या आरोपांचे काय झाले, संजय राऊतांचा थेट प्रश्न
BMC Maharashtra Municipal Corporation Election 2026 News LIVE Updates: महापालिक निवडणुकीच्या प्रचाराला लवकरच सुरूवात होणार असून आजपासून मुख्यमंत्र्याचाही प्रचाराचा झंझावात दिसणार आहे. 15 जानेवारीला मतदाना तर 16 तारखेला मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
नाताळच्या सुट्ट्या , नवीन वर्षात भाविकांकडून साईंच्या चरणी विक्रमी दान
सुट्ट्यांच्या कालावधीत भाविकांकडून साईंच्या चरणी 8 दिवसांच्या कालावधीत तब्बल 23 कोटी 29 लाख 23 हजार 373 रुपये रकमेचे दान. साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांची माध्यमांना माहिती. नाताळाच्या सुट्ट्या नवीन वर्षाच्या स्वागतादरम्यान 8 लाखांहून अधिक भाविक साईचरणी नतमस्तक.
-
शिवसेना(शिंदे) महिला आघाडित नाराजी नाट्य सुरूच…
निलम गोरे, विजय शिवतारे अन्याय करत असल्याचा महिला आघाडीतील नेत्यांनी आरोप केला आहे. आज महिला आघाडीतील नेत्या सामूहिक राजीनामा देणार आहेत. उमेदवारी देताना विश्वासात न घेतल्याचा महिला आघाडीचा आरोप आहे. चैत्राली गुरव महिला आघाडी शिवसेना उपशहर प्रमुख यांनी माहिती दिली आहे.
-
-
अजित दादा राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर लेकी साठी मैदानात
आमदार खोसकर यांची कन्या इंदुमती खोसकर प्रभाग 6 मधून निवडणूक लढवत आहे. मखमलाबाद राम मंदिरा पासून प्रचाराला सुरुवात झाली. नाशिकच्या प्रभाग 6 मध्ये ऐतिहासिक विजय होणार… खोसकर यांना मुलीच्या विजयाची खात्री…
-
केडीएमसीत ‘लोकशाही दिन’ तात्पुरता स्थगित
महानगरपालिका निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू असल्याने आचारसंहिता शिथिल होईपर्यंत लोकशाही दिनाचे आयोजन नाही. शासन परिपत्रकानुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा परिपत्रक काढत निर्णय घेतला. 15 डिसेंबर 2025 पासून आचारसंहिता प्रभावात असून नागरिकांनी याची नोंद घ्यावी – केडीएमसी प्रशासनाचे आव्हान आहे.
-
नाशिकच्या रामकुंडाच्या पात्राची स्वच्छता सुरू
रामकुंडाच्या पात्रामधून गाळ काढायच्या कामाला सुरुवात झाली आहे. राम काल पथ कामाचा भाग म्हणून रामकुंड परिसराचे सुशोभीकरण होणार आहे. सुशोभीकरणापूर्वी संपूर्ण पात्र स्वच्छ करण्यास सुरुवात झाली आहे. जेसीबी आणि इतर मशिनरी वापरून स्वच्छ संपूर्ण रामकुंड परिसर आणि रामकुंडाचे पात्र केला जातो आहे
-
-
छत्तीसगड राज्यात पोलीस आणिवमाओवाद्यांमध्ये मोठी चकमक, १२ माओवादयांना कंटस्नान घालण्यात पोलिसांना यश
सुकमा जिल्ह्यातील कोटा कीष्टराम जंगल परिसरातील घटना घडली आहे. आज पहाटेपासूनच ऑपरेशन सुरू झाला होता. डी आर जी व सीआरपीएफ पोलिसांच्या ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी जंगलात प्रवेश केल्यानंतर माओवादी संघटनेने हल्ला केला. प्रत्युत्तर देत जवळपास दीड तास चकमक सुरु होती. कोटा येथील पोलीस अधीक्षक किरण चव्हाण यांनी माहिती दिली.
-
वसई विरार महापालिका निवडणुकीत 547 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
29 प्रभागात 115 सदस्यांसाठी होत आहे निवडणूक. 833 वैध उमेदवारा पैकी 286 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्या नंतर 547 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीत सर्वाधिक उमेदवार नालासोपारा पूर्व धानिव-पेल्हार प्रभाग समिती एफ मध्ये 116, विरार पूर्व प्रभाग समिती सी मध्ये 109, वसई पूर्व फादरवाडी-गोखीवरे विभागात 108 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
-
-
नांदेड प्रभाग क्रमांक 14 मधील उमेदवारांना बोलतानाची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल.
माजी मंत्री डी. पी सावंत व अशोकराव चव्हाण यांचा फोनवरून संवाद व्हायरल. जोंधळे आपले एक हिंदू पॅनल उभ करू अशोक चव्हाण. आपल्याला मुस्लिम उमेदवार नको, तो मते खाऊ शकत नाही माजी मंत्री डी. पी. सावंत एकाच फोनवरून डी. पी सावंत व अशोक चव्हाण यांचा उमेदवार संजय जोंधळे सोबत संभाषण व्हायरल
-
ऐन निवडणुकीत ठाकरे गटाचा काँग्रेसला मोठा धक्का
माजी नगरसेवक विजय काटकर, काँग्रेसचे सलीम काझी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. तिकीट वाटपात अन्याय; निष्ठेला किंमत नाही, पैशाला किंमत असल्याचा आरोप. शिवसेना उपनेते विजय उर्फ बंड्या साळवी तिकीट देताना एक ते दोन कोटींची मागणी केल्याचा गंभीर आरोप. तर काँग्रेसमध्ये सन्मान न मिळाल्याने सलीम काझींचा शिंदे गटात प्रवेश….दोन्ही नेत्यांनी आपल्या पक्षावर ओढले ताशेरे
-
अजित पवारांवरील घोटाळ्याच्या आरोपांचे काय? संजय राऊत यांचा प्रश्न
अजित पवारांवरील घोटाळ्याच्या आरोपांचे काय झाले म्हणत संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला. सिंचन घोटाळ्याचे काय झाले? अजित पवारांवर 70 कोटींचा आरोप आम्ही केला.
-
गडचिरोली – प्रसूतीसाठी सहा किलोमीटर पायपीट, गरोदर महिलेचा बाळासाह मृत्यू
गडचिरोली प्रसूतीसाठी सहा किलोमीटर पायपीट करणाऱ्या गरोदर मातेचा बाळासह मृत्यू झाला. एटापली तालुक्यातील अलदंडी येथील आशा संतोष किरंगा या गरोदर मातेला काल रात्री प्रसूती वेदना सुरू झाल्या. रस्ते चांगले नसल्यामुळे रुग्णवाहिका जंगल भागात पोहोचत नाहीत, अशा परिस्थितीत या गरोदर मातेने पायपीट करत 6 किलोमीटर प्रवास केला. मात्र वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे पोटातच बाळाचा मृत्यू झाला व काही तासात मातेने अखेरचा श्वास घेतला.
-
धाराशिव – वाशी तालुक्यातील पारा गावात पवनचक्की कंपनीविरोधात आदिवासी समाजाचे तीव्र आंदोलन
धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पारा गावात सीरिँटिका पवनचक्की कंपनीविरोधात आदिवासी समाजाचे तीव्र आंदोलन सुरू आहे. महिला आक्रमक झाल्या असून त्यांनी थेट लाईटच्या टॉवरवर चढून आंदोलन केलं. पवनचक्की कंपनीकडून योग्य मोबदला न मिळाल्याचा आदिवासी समाजाचा आरोप असून आदिवासी समाज आक्रमक झाला आहे. जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
-
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत पवार आणि शिंदे गटाच्या पॅम्प्लेटवर भाजप आमदाराचा फोटो
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाच्या पॅम्प्लेटवर भाजप आमदाराचा फोटो . – भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचा फोटो विरोधी पॅनलच्या पॅम्प्लेटवर आल्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. प्रभाग 7 मधील राष्ट्रवादी आणि शिवसेना उमेदवारांच्या प्रचारातील पॉम्प्लेटवर आमदार विजयकुमार देशमुख यांचा फोटो दिसला. सोलापूर महानगरपालिकेसाठी भाजपकडून 102 उमेदवार मैदानात उतरवण्यात आले आहेत.
-
अजित पवार गटाचे उमेदवार पैसे वाटत असल्याचा आरोप
पुणेै – राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार बाबुराव चांदेरेचा मुलगा किरण चांदेरे पैसे वाटत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. भारतीय जनता पार्टीचे उमदेवार गणेश कळमकर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी रात्री एका महिलेला पकडले, ही महिला प्रभागातील महिलांची नाव लिहून घेत असल्याचे सांगत आहे. महिलेने देखील चांदेरेचे नाव घेतल्याचे समोर आले आहे. बाबुराव चांदेरे यांचा मुलगा किरण चांदेरेसह,सिद्धु कालशेट्टी,राजु चौकीमट परेश मुरकुटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रचाराचा आजपासून झंझावात सुरू होणार आहे. मुख्यमंत्र्याच्या मुंबईत 6 पेक्षा अधिक सभा होणार असून अनेक ठिकाणी रोड शोचेही आयोजन करण्यात आलं आहे. आज वरळीत फडणवीस आणि शिंदेंच्या उपस्थितीत संयुक्त मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यात MPSC परीक्षार्थींच्या आंदोलनात मनोज जरांगे पाटील यांचा सहभाग, पोलीस उपनिरीक्षक पदासाठी वयोमर्यादेत वाढ करण्याची मागणी आहे. जाहिरात उशीरा प्रसिद्ध झाल्याने लाखो विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण 649 उमेदवार रिंगणात आहेत, एकूण 269 उमेदवारांनी माघार घेतली. यासह देश-विदेश, महाराष्ट्र, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी तुम्हाला इथे वाचायला मिळतील. त्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
Published On - Jan 03,2026 8:59 AM
