Hemlata Patkar: मोठी अपडेट! 10 कोटींची खंडणी घेणाऱ्या अभिनेत्री प्रकरणात मोठा ट्विस्ट, कोर्टात नेमकं काय घडलं?
Hemlata Patkar: काही दिवसांपूर्वी मराठमोळी अभिनेत्री हेमलता बाणे पाटकरला 10 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात अटक केली होती. मुंबईच्या गुन्हे शाखेने अभिनेत्रीला खंडणीचा पहिला हफ्ता दीड कोटी घेताना रंगेहात पकडले होते. आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.

2025 वर्षाच्या अखेरीस मराठी मनोरंजन विश्वात मोठी खळबळ माजली आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अर्चना पाटकर यांची सून हेमलता पाटकर उर्फ हेमलता बाणे आणि तिची मैत्रीण अमरिना झवेरी उर्फ फर्नांडिस यांना 10 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली होती. पोलिसांनी रंगेहात दोघींना पकडले. या प्रकरणाने संपूर्ण इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला. आता अटकेनंतर काही दिवसांनी न्यायालयाकडून मोठी अपडेट समोर आली आहे.
कोर्टाने मंजुर केला जामीन
37 वे महानगर दंडाधिकारी विनोद पाटील यांनी हेमलता बाणे आणि अमरिना झवेरी यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन दिला. अटकेच्या काही दिवसांनंतर दोघींचाही जामीन मंजूर झाला आहे. या दोघींवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 308 आणि 61 अंतर्गत खंडणी मागणे व गुन्हेगारी कट रचण्याचे आरोप लावण्यात आले होते. आरोपींच्या वकिलांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद करताना हे आरोप खोटे असल्याचा दावा केला.
हेमलता पाटकचा संबंध नाही
अमरिनाच्या FIR नुसार, १५ नोव्हेंबर रोजी लिफ्टमध्ये रिदम गोयल आणि त्याच्या मित्रांनी दारूच्या नशेत शिवीगाळ करत मारहाण केली. गर्भवती असल्याचे सांगूनही पोटावर प्रहार केल्यामुळे गर्भपात झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, हे प्रकरण समोर आल्यानंतर अभिनेत्री अर्चना पाटकर यांनी स्पष्ट केले की, हेमलता त्यांच्या कुटुंबाशी गेल्या काही वर्षांपासून संबंधित नाही आणि घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा त्यांच्या कारकीर्दीशी काहीही संबंध नसल्याचे त्यांनी नमूद केले.
नेमकं प्रकरण काय?
मुंबई गुन्हे शाखेने गोरेगाव येथून एका बिल्डरकडून मागितलेल्या १० कोटींच्या खंडणीच्या पहिल्या हप्त्याच्या रूपाने १.५ कोटी रुपये स्वीकारताना मराठमोळी अभिनेत्री हमेलता पाटकर आणि तिच्या सहकारीला अटक करण्यात आली. तक्रारदार अरविंद गोयल यांनी आरोप केला आहे की ही रक्कम अंबोली पोलीस ठाण्यात त्यांच्या मुलाविरुद्ध दाखल गुन्हेगारी प्रकरण मिटवण्यासाठी मागितली गेली होती. त्यानंतर अभिनेत्री हेमलता पाटकर चर्चेत आल्या. आता हे प्रकरण कोर्टात गेले असून कोर्टाने हेमलता आणि त्यांच्या मैत्रिणीचा जामीन मंजूर केला आहे.
