Sunny Deol : मेरा दिमाग हिला हुआ है.. ‘बॉर्डर’च्या साँग लाँच दरम्यान सनी देओल काय बोलला ?
"बॉर्डर 2" चित्रपटातील गाण्याच्या लाँचदरम्यान वडील धर्मेंद्र यांच्या आठवणीने सनी देओल भावुक झाला. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये धर्मेंद्र यांचं निधन झालं, त्या दुःखातून सनी देओल अजूनही सावरत आहे. मी जास्त काही बोलण्याच्या मनस्थितीत नाही असं म्हणताना सनी देओल...

काही काळापूर्वी बॉलिवूड स्टार सनी देओल (Sunny Deo) वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होता. मात्र आता लवकरच त्याचा बॉर्डर 2 हा चित्रपट रिलीज होणार असून सगळीकडे त्याचीच चर्चा आहे. 2026 मधील ही मोस्ट अवेटेड फिल्म असून अनेकांना हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता आहे. अलीकडेच, सनी देओल “बॉर्डर” मधील “घर कब आओगे” या गाण्याच्या लाँचसाठी संपूर्ण टीमसह जैसलमेरमध्ये पोहोचला. तेव्हा वडील धर्मेंद्र (Dharmendra) यांच्या आठवणीत तो भावुक झाला. वडील धर्मेंद्र यांच्या प्रसिद्ध चित्रपट ‘हकीकत’मुळे देशभक्तीपर चित्रपटांमध्ये येण्याची प्रेरणा कशी मिळाली हेही सनी देओलने यावेळी सांगितलं.
इव्हेंटदरम्यान सनीने सर्वांची प्रेमाने विचारपूस केली. ‘ तुम्ही सगळे कसे आहात? जेव्हापासून मी ‘बॉर्डर’ चित्रपट केला तेव्हापासून मी तुमच्या कुटुंबाचा एक भाग झालो आहे. मी ‘बॉर्डर’ चित्रपट केला कारण जेव्हा मी माझ्या वडिलांचा ‘हकीकत’ चित्रपट पाहिला तेव्हा मला तो खूप आवडला. त्यावेळी मी खूप लहान होतो. जेव्हा मी अभिनेता झालो, तेव्हा मी माझ्या वडिलांसारखा चित्रपट बनवण्याचा निर्धार केला होता. मग मी जेपी दत्ता यांच्याशी बोललो आणि आम्ही मिळून या विषयावर एक चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला, जो खरोखरच खूप गोड आहे आणि आजही तुमच्या हृदयात जिवंत आहे’ अशी आठवण सनीने बॉर्डर चित्रपटाबद्दल सांगितली.
वडिलांच्या आठवणीत सनी झाला भावूक
या इव्हेंटदरम्यान सनी देओल खूपच भावूक झाल्याचं दिसलं. ‘ मेरा दिमाग अभी थोड़ा हिला हुआ है’ असं म्हणत सध्या मी जास्त काही बोलू शकणार नाही असं सनीने यावेळी नमूद केलं. वडील धर्मेंद्र यांच्या निधनामुळे संपूर्ण कुटुंब दु:खात असून सनीचा निर्देशही त्याच गोष्टीकडे होता.
गेल्या वर्षी 24 नोव्हेंबर कोजी ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालं. बऱ्याच काळापासून ते आजारी होते, अखेर वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. दरम्यान त्यांच्या जाण्यानंतर धर्मेंदर यांचा ‘ इक्कीस’ हा अखेरचा चित्रपट चित्रपटगृहात 1 जानेवारीला रिलीज झाला. त्यामध्ये धर्मेंद्र यांच्यासोबतच अगस्त्य नंदा, सिमर भाटिया यांचीही मुख्य भूमिका आहे. तर सनी देओल याचा ‘बॉर्डर 2’ हा चित्रपट 23 जानेवारी रोजी रिलीज होणार आहे. त्यामध्ये अहान शेट्टी, वरूण धवन आणि दिलजीत दोसांज यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
