AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फिरायला बाहेर पडला, एअर बॅगमुळे 6 वर्षांचा चिमुकला जीवानिशी गेला

वाढत्या अपघातांची संख्या लक्षात घेऊन वाहतूक विभागाकडूनही नियम कठोर करण्यात आले असून कारमधील एअर बॅगच्या नियमांचाही त्यात समावेश आहे. एखाद्या गाडीचा अपघात झाला तर एअर बॅग ही जीव वाचवणारी, जीवदान देणारी ठरते, असं म्हटलं जातं.

फिरायला बाहेर पडला, एअर बॅगमुळे 6 वर्षांचा चिमुकला जीवानिशी गेला
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Dec 25, 2024 | 8:54 AM
Share

सध्या देशभरात अपघातांची संख्या प्रचंड वाढली असून त्यामुळे असंख्य लोकांना जीव गमवावा लागत आहे. वाढत्या अपघातांची संख्या लक्षात घेऊन वाहतूक विभागाकडूनही नियम कठोर करण्यात आले असून कारमधील एअर बॅगच्या नियमांचाही त्यात समावेश आहे. एखाद्या गाडीचा अपघात झाला तर एअर बॅग ही जीव वाचवणारी, जीवदान देणारी ठरते, असं म्हटलं जातं. पण नवी मुंबईमध्ये कारमधील हीच एअर बॅग जीव वाचवणारी नव्हे तर काळ ठरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एअर बगमुळे अवघ्या 6 वर्षांच्या चिमुकल्या मुलाला जीव गमवावा लागल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हर्ष असे त्या 6 वर्षांच्या चिमुकल्या मुलाचे नाव असून वाशीमध्ये हा दुर्दैवी प्रकार घडला आहे. अपघात झाल्यावर जी एअर बॅग आयुष्य वाचवते, त्याच एअर बॅमगुळे चिमुकल्याचा जीव गेला. चिमुकला हर्ष हा वडिलांसोबत बाहेर गेला होता. त्याचे वडील कार चालवत होते, तर तो वडिलांच्या शेजारीच फ्रंट सीटवर बसला होता. मात्र अचानक त्यांची गाडी एका डिव्हायडरवर आदळली आणि विचित्र अपघात झाला.

या अपघातामुळे कारमधील एअर बॅग्स उघडल्या गेल्या, मात्र त्यांचा जोर अतिशय जास्त असल्यामुळे समोरच बसलेल्या चिमुकल्या हर्षच्या गळ्याला मार लागला. आणि दुर्दैवाने त्याचा गुदमरून मृत्यू झाला. त्यामुळे मोठी खळबळ माजली. वाशी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. हर्षचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. एवढ्या छोट्या मुलाच्या अशा दुर्दैवी मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत असून त्याच्या कुटुंबावर तर दु:खाचा मोठा डोंगरच कोसळला आहे.

Follow Us
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...