पत्नीसमोर अपमान करायचा बाप, पगाराचे पैसेही हिसकावून घ्यायचा, मग एक दिवस…

बापाला दारुचे व्यसन होते. दारुच्या नशेत रोज घरी मुलाशी भांडण करायचा. मुलाला त्रास देण्याची एक संधी सोडत नव्हता. अखेर मुलाच्या सहनशक्तीचा अंत झाला अन् भलतंच घडलं.

पत्नीसमोर अपमान करायचा बाप, पगाराचे पैसेही हिसकावून घ्यायचा, मग एक दिवस...
शेतीच्या वादातून शेजाऱ्याने जावयाला संपवले
Follow us
| Updated on: May 12, 2023 | 9:33 PM

ग्वाल्हेर : दारुच्या नशेत बाप दररोज भांडण करायचा, शिवीगाळ आणि मारहाणही करायचा. इतकेच नाही तर दारुसाठी पगाराचे पैसे काढून घ्यायचा. अखेर बापाच्या या रोजच्या त्रासाला कंटाळून मुलाने त्याची हत्या केली. ग्वाल्हेरच्या आंतरी पोलीस स्टेशन हद्दीतील खेरवाया गावात ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. आकाश जाट असे आरोपी मुलाचे नाव आहे. तर गजेंद्र जाट असे मयत पित्याचे नाव आहे. गजेंद्रची चार दिवसापूर्वी हत्या करण्यात आली होती. हत्येची घटना उघड होताच पोलीस कसून तपास करत होते. अखेर या हत्येचा उलगडा करण्यास पोलिसांना यश आले आहे.

गजेंद्रला दारुचे व्यसन होते

गजेंद्र जाट याचा मृतदेह घराबाहेर बेडवर पडलेला आढळून आला होता. घराबाहेर झोपलेल्या गजेंद्रचा कोणीतरी धारदार शस्त्राने डोक्यात वार करून खून केला असल्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. तपासादरम्यान आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना सांगितले की, गजेंद्र त्याचा मुलगा आकाशसोबत काही दिवसांपासून भांडण करत असे. गजेंद्रला दारू पिण्याचे व्यसन होते, त्यामुळेच मुलाच्या पगाराचे पैसेही हिसकावून घेत असे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आकाशची चौकशी केली.

सुनेसमोरही मुलाचा अपमान करायचा

सुरवातीला आकाशने पोलिसांची दिशाभूल केली, पण पोलिसी खाक्या दाखवताच हत्येचा उलगडा केला. गजेंद्रच्या पत्नीचे 15 वर्षांपूर्वी निधन झाले होते. गजेंद्रला दोन मुली आणि एक मुलगा अशी तीन मुले आहेत. मोठ्या मुलीचे लग्न झाले आहे. मुलगा आकाशचेही वर्षभरापूर्वी लग्न झाले. गजेंद्र हा आकाशकडे दारूसाठी पैशांची मागणी करायचा. पैसे न दिल्याने शिवीगाळ आणि भांडण करायचा. आकाशच्या पत्नीसमोरही तो त्याचा अपमान करायचा. या रोजच्या भांडणाला कंटाळून आकाशने वडिलांची हत्या केल्याचे पोलीस चौकशीत सांगितले.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.