आईच्या मृतदेहासोबत घालवले महिने, वर्षानुवर्षे घरात राहिला कैद… सायको मुलाची थक्क करणारी कहाणी!
एक मुलगा आईच्या मृत्यूनंतर तिच्या मृतदेहासोबत महिन्यांपासून घरात राहत होता, हत्येच्या संशयावरून त्याला अटक झाली असून तपास सुरू आहे. शेजाऱ्यांनी गेल्या 13 वर्षांपासून त्याला बाहेर पडताना पाहिलं नाही. चला, जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण काय आहे...

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी एका अशा मुलाला अटक केली जो आपल्या मृत आईच्या शवासोबत काही महिने घरातच राहात होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे शेजाऱ्यांचं म्हणणं आहे की त्यांनी या मुलाला गेल्या 13 वर्षांपासून घराबाहेर पडताना पाहिलं नाही. आता नेमकं प्रकरण काय आहे? चला जाणून घेऊया…
खरंतर, 6 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पोलिसांना एका महिलेचा फोन आला. तिने सांगितलं की तिच्या शेजाऱ्याची गेल्या एक महिन्यापासून काही खबर नाही. जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. दरवाजा तोडण्यासाठी फायर ब्रिगेडला बोलावण्यात आलं. पण तेवढ्यात दरवाजा उघडला आणि समोर आला 43 वर्षांचा मुलगा जेवियर एस जो पूर्णपणे थकलेला, घाणेरड्या कपड्यांमध्ये आणि घाबरलेला दिसत होता.
वाचा: 6 वर्षे फिरत होता फेक IAS बनून, 150 लोकांकडून लुटले 80 कोटी… मग कायद्याने…
80 वर्षीय अँटोनियाचा मृतदेह
आत जाऊन जेव्हा पोलिसांनी आईच्या खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा 80 वर्षीय अँटोनियाचा मृतदेह खाटेवर पडलेला आढळला, जवळ रेडिओ चालू होता आणि एक पंखा अजूनही चालत होता. खोलीतून दुर्गंधी येत होती. कारण जेवियरने दरवाजा टेपने सील केला होता, जेणेकरून सडण्याचा वास बाहेर जाऊ नये. तपासात जेवियरने स्वतः सांगितलं की तो गेल्या आठ वर्षांपासून घराबाहेर पडला नव्हता. त्याची आईच सर्व खरेदी आणि बाहेरील कामं करायची. जेव्हा अँटोनियाचा मृत्यू झाला, तेव्हापासून जेवियर आईने आधीच खरेदी केलेले बिस्किटं, तांदूळ आणि हरभरे खाऊन जिवंत होता. शेजाऱ्यांनी सांगितलं की, आम्ही त्याला गेल्या 13 वर्षांपासून बाहेर पाहिलं नाही. त्याची आई खूप सगळ्यांकडे जायची. पण मुलगा पूर्णपणे तिच्यावर अवलंबून होता.
बाथरूममध्ये रक्ताचे डाग
सुरुवातीला जेवियरने सांगितलं की त्याच्या आईचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाला. पण पोलिसांना बाथरूममध्ये रक्ताचे डाग आढळले, जे त्याचेच असल्याचं सांगितलं गेलं. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातही हिंसक मृत्यूचे संकेत मिळाले आहेत. त्यानंतर पोलिसांनी 14 ऑक्टोबर रोजी जेवियरला हत्येच्या संशयावरून अटक केली. मात्र, कोर्टात हजर केल्यानंतर त्याला जामिनावर सोडण्यात आलं आहे, पण तपास अजूनही सुरू आहे. पोलिसांनी सांगितलं की आई-मुलामध्ये नेमकं काय झालं? हे जाणून घेण्यासाठी अंतिम अहवालाची वाट पाहावी लागेल. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
