Dombivali Crime : जेष्ठ नागरिकांना एकटे गाठून बोलण्यात गुंतवतात, मग त्यांच्याकडील ऐवज घेऊन पसार !

जेष्ठ नागरिकांना रस्त्यात एकटे गाठत लुटण्याच्या घटना सध्या वाढत आहेत. यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Dombivali Crime : जेष्ठ नागरिकांना एकटे गाठून बोलण्यात गुंतवतात, मग त्यांच्याकडील ऐवज घेऊन पसार !
जेष्ठ नागरिकाला एकटे गाठत भररस्त्यात लुटलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 08, 2023 | 2:55 PM

डोंबिवली / 8 ऑगस्ट 2023 : डोंबिवलीत भुरट्या चोरांचा सुळसुळाट झाला आहे. महिला, जेष्ठ नागरिकांना एकटे गाठून लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे महिला आणि जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशीच एक पुन्हा डोंबिवलीती घडली आहे. एका जेष्ठ नागरिकाला रस्त्यात एकटे गाठून मंत्र बोलण्यास सांगत बोलण्यात गुंतवून लुटल्याची घटना डोंबिवलीतील गुप्ते रोडवर घडली आहे. याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात जेष्ठ नागरिकाच्या फिर्यादीवरुन दोन अनोखळी इसमांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

भाजी आणायला गेलेल्या जेष्ठ नागरिकाला लुटले

डोंबिवलीतील गरीबाचा वाडा येथील दत्ताराम भिकाराम पार्टे हे 70 वर्षीय इसम काल दुपारच्या सुमारास भाजीपाला खरेदी करुन गुप्ते रोडवरुन चालले होते. यावेळी दोन अनोळखी इसम त्यांच्याजवळ आले. त्यांनी पार्टे यांच्याशी संवाद साधत त्यांना ओम नमः शिवाय मंत्र बोलण्यास सांगितले. मग त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांचे लक्ष विचलित करुन त्यांच्याकडील सोन्याची चैन, अंगठी आणि 2700 रुपये असा 53 हजाराचा मुद्देमाल घेऊन फरार झाले.

पोलिसांकडून अनोळखी चोरट्यांचा शोध सुरु

चोरटे गेल्यानंतर आपल्याला लुटल्याचे पार्टे यांच्या लक्षात आले. यानंतर पार्टे यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार विष्णुनगर पोलिसांनी दोन अनोळखी इसमांविरोधात फसवणूक, चोरी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अनोळखी चोरट्यांचा शोध सुरु केला आहे. मात्र या घटनेमुळे जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
तर मी राजीनामा देऊन...., बीडमधील सभेत उदयनराजे भोसले भावूक
तर मी राजीनामा देऊन...., बीडमधील सभेत उदयनराजे भोसले भावूक.
...तर उद्धव ठाकरे लवकरच तुरुंगात दिसतील, अरविंद केजरीवाल यांचा दावा
...तर उद्धव ठाकरे लवकरच तुरुंगात दिसतील, अरविंद केजरीवाल यांचा दावा.
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने.
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात.
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.