kalyan Crime : दीड कोटींचा चोरीला गेलेला मुद्देमाल नागरिकांना केला परत, कल्याण पोलिसांची दमदार कामगिरी !

कल्याण परिमंडळ झोन 3 अंतर्गत असलेल्या आठ पोलीस ठाण्यातील एकूण 80 गुन्हाचे उकल करण्यास पोलिसांना यश मिळाले आहे. आठ पोलीस ठाण्यातील चोरीच्या गुन्ह्यातील एकूण 1 कोटी 50 लाख 99 हजार 41 रुपयांचा चोरलेला मुद्देमाल जप्त करत आज नागरिकांना परत करण्यात आलाय.

kalyan Crime : दीड कोटींचा चोरीला गेलेला मुद्देमाल नागरिकांना केला परत, कल्याण पोलिसांची दमदार कामगिरी !
दीड कोटींचा चोरीला गेलेला मुद्देमाल नागरिकांना केला परतImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 17, 2022 | 8:58 PM

कल्याण : कल्याण डोंबिवलीत गेल्या काही दिवसांपासून चोरी (Theft)चे प्रमाण वाढले आहे. एकदा वस्तू चोरीला गेली की, ती परत मिळणे तसं मुश्किल असतं. कल्याण परिमंडळ झोन 3 मध्ये विविध प्रकारच्या चोरीचे एकूण 80 गुन्हे दाखल झाले होते. एकूण आठ पोलीस ठाण्यातील चोरीच्या गुन्ह्यातील एकूण 1 कोटी 50 लाख 99 हजार 41 रुपयांचा चोरलेला मुद्देमाल (Stolen Goods) आज नागरिकांना परत (Return) करण्यात आला आहे. कल्याण पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. दरम्यान, या गुन्ह्याची संख्य पाहता कल्याणमध्ये चोरीचे प्रमाण अधिक असले तरी जबरी चोरीचे प्रमाण डोंबिवलीमध्ये अधिक असल्याचे दिसून येत आहे. मात्र गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनीही कंबर कसली आहे.

दीड कोटीचा चोरीचा मुद्देमाल नागरिकांना परत करण्यात आला

कल्याण डोंबिवलीत परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरी, जबरी चोरी, घरफोडी, दरोडा, वाहन चोरीचे घटना मोठ्या प्रमाणात घडत आहे. कल्याण झोन 3 अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, कल्याण डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील आणि सुनील कुऱ्हाडे यांनी विशेष टीम बनवत सर्व पोलीस स्थानकाला लवकरात लवकर गुन्हे उघडकीस आणण्यास आदेश दिले. त्यानुसार कल्याण परिमंडळ झोन 3 अंतर्गत असलेल्या आठ पोलीस ठाण्यातील एकूण 80 गुन्हाचे उकल करण्यास पोलिसांना यश मिळाले आहे. आठ पोलीस ठाण्यातील चोरीच्या गुन्ह्यातील एकूण 1 कोटी 50 लाख 99 हजार 41 रुपयांचा चोरलेला मुद्देमाल जप्त करत आज नागरिकांना परत करण्यात आलाय. हा कार्यक्रम अप्पर पोलीस आयुक्त कल्याण विभाग दत्तात्रय शिंदे यांच्या विशेष उपस्थितीत कल्याण पश्चिमेकडील वायले नगर येथील साई हॉल येथे हा संपन्न झाला.

कल्याण डोंबिवलीतील चोरीचे प्रकार आणि उघडकीस आलेली गुन्ह्याची संख्या

कल्याण डोंबिवली परिसरात एकूण चोरी – 38 जबरी चोरी – 11 घरफोडी – 9 दरोडा – 1 फसवणूक – 5 मिसिंग – 13 एकूण – 80 गुन्हे दाखल (The Kalyan police returned the stolen goods worth one and a half crores to the citizens)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.