AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझी आई जिवंत आहे ! आठ महिन्यांपासून मुलाच्या सरकारी कार्यालयात चकरा, काय आहे प्रकरण ?

फेब्रुवारी 2022 मध्ये राकेश मित्तल याला कुटुंबाचे ओळखपत्र मिळाले. यामध्ये त्याची आई धनपती हिला मृत दाखवण्यात आले आहे.

माझी आई जिवंत आहे ! आठ महिन्यांपासून मुलाच्या सरकारी कार्यालयात चकरा, काय आहे प्रकरण ?
जिवंत महिलेला मृत घोषित करुन पेन्शन बंदImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Sep 16, 2022 | 9:32 PM
Share

हरियाणा : एका जिवंत वृद्ध महिलेला मृत घोषित (Death Declair) करुन तिची पेंशन (Pension) बंद केल्याचा प्रकार हरियाणातील पानिपतमध्ये उडकीस आला आहे. यानंतर आईची पेंशन पुन्हा सुरु करण्यासाठी गेल्या आठ महिन्यांपासून मुलगा सरकारी कार्यालयाच्या चकरा मारत आहे. हरियाणातील अनेक जिल्ह्यांमध्ये सरकार आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे (Due to Negligence) मोठ्या प्रमाणात वृद्धांची पेन्शन बंद करण्यात आली आहे. त्यांना आता वृद्धापकाळात पेन्शन मिळत नाही.

कौटुंबिक ओळखपत्रात महिलेला मृत दाखवले

पानिपतच्या समलखा ब्लॉकमधील पाओती गावात मित्तल कुटुंबीय राहते. फेब्रुवारी 2022 मध्ये राकेश मित्तल याला कुटुंबाचे ओळखपत्र मिळाले. यामध्ये त्याची आई धनपती हिला मृत दाखवण्यात आले आहे. हे कौटुंबिक ओळखपत्र अपडेट करून समाजकल्याणच्या पोर्टलवर टाकण्यात आले. त्यामुळे त्याच्या आईची पेन्शन बंद झाली.

पेन्शन न मिळाल्याने चौकशी केली असता बाब उघड

दोन महिने पेन्शनची वाट पाहिली. पेन्शन बँक खात्यात आली नाही, तेव्हा समाजकल्याण कार्यालयात चौकशी केली असता त्याची आई मरण पावल्याची माहिती दिली. कागदपत्रांमध्ये ती मृत असल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर त्याने आई जिवंत असल्याची माहिती दिली आणि कागदपत्रेही दाखवली, पण कोणीही मान्य केले नाही.

अखेर आईसोबत चंदीगड ऑफिस गाठले

यानंतर त्याने जिल्हा समाज कल्याण विभाग, सीएम विंडो, एडीसी कार्यालय गाठले. मात्र त्याचे कोणीही ऐकले नाही. अखेर नाराज झाल्याने त्याने आईसोबत चंदीगड ऑफिस गाठले. कौटुंबिक ओळखपत्रात त्याच्या आईला चुकून मृत घोषित केल्याचे येथे आढळून आले.

पीपीपी निश्चित केल्यानंतर त्यांची पेन्शन सुरू केली जाईल. आता कौटुंबिक ओळखपत्रातही त्यांनी ही चूक दुरुस्त करून घेतली. मात्र त्यानंतरही समाजकल्याण विभागाने त्यांच्या आईची पेन्शन सुरू केले नाही.

धनपती यांचे आधार कार्ड, पेन्शन आयडी तपासल्यानंतर जिल्हा समाज कल्याण अधिकारी रवींद्र हुड्डा यांनी पेन्शन रेकॉर्ड योग्य असल्याचे सांगितले. पोर्टलवर कौटुंबिक ओळखपत्र अद्ययावत होताच त्यांची पेन्शन सक्रिय होईल. पेन्शनची थकबाकीही मिळेल, असेही हुड्डा म्हणाले.

हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.