‘स्पेशल 26’ चित्रपट पाहून गँग बनवली, दिल्लीत ठगांकडून थेट कॉल सेंटर लक्ष्य, 6 जणांना अटक

‘स्पेशल 26’ चित्रपट पाहून गँग बनवली, दिल्लीत ठगांकडून थेट कॉल सेंटर लक्ष्य, 6 जणांना अटक

दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी रविवारी (28 मार्च) कॉल सेंटरची लुटमार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका गँगच्या मुसक्या आवळल्या आहेत.

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Mar 28, 2021 | 6:43 PM

नवी दिल्ली : चोरीसाठी कोण काय मार्ग निवडेल हे काही सांगता येत नाही. अनेकदा घडलेल्या गुन्ह्यांवरुन चित्रपट तयार होतात. मात्र, बऱ्याचदा चित्रपटातील शक्कल लढवून चोरीच्या घटनाही घडतात. असाच एक प्रकार राजधानी दिल्लीत घडलाय. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी रविवारी (28 मार्च) कॉल सेंटरची लुटमार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका गँगच्या मुसक्या आवळल्या आहेत. या गँगने चक्क ‘स्पेशल 26’ हा चित्रपट पाहून चोरीला प्लॅन बनवल्याचं चौकशीत समोर आलंय (Thief gang make plan after watching Special 26 bollywood movie in Delhi arrested).

पोलिसांनी या गँगमधील 6 आरोपींना अटक केली आहे. बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट स्पेशल 26 पाहिल्यानंतर आपल्याला चोरीची ही युक्ती सुचल्याचं यातील एका आरोपीने कबुल केलंय. हे ऐकून पोलीसही आवाक झालेत. आरोपींकडून 3 लॅपटॉप, एक आयपॅड, एक डीएसएलआर कॅमरा, 3 लग्जरी घड्याळं, कपडे आणि गाडी जप्त करण्यात आलीय.

हेही वाचा :

विमानात थरार! त्याला राग आला, सीटवरुन उठला, एमरजन्सी डोअर जोरात उघडायला लागला, 89 प्रवाशांची धडधड

Sachin Waze: मुंबई पोलीस दलातील ‘त्या’ अधिकाऱ्याकडे केस गेली अन् घाबरलेल्या सचिन वाझेंनी मनसुखला संपवले

लग्न खरेदीच्या नावाखाली बनावट Paytm अ‍ॅपद्वारे गंडा, नवी मुंबईत बंटी-बबलीच्या टोळीला अटक

व्हिडीओ पाहा :

Thief gang make plan after watching Special 26 bollywood movie in Delhi arrested

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें