AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गॅस कटरने मशीन कापलं, लुटले लाखो रुपये… नंतर ATM ला थेट आगच लावली, चोरांच्या कृत्याने हादरलं शहर

एटीएम गॅस कटरने कापून चोरट्यांनी 34 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. यानंतर मशीनला आग लावली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला.

गॅस कटरने मशीन कापलं, लुटले लाखो रुपये... नंतर ATM ला थेट आगच लावली, चोरांच्या कृत्याने हादरलं शहर
| Updated on: Nov 06, 2023 | 2:58 PM
Share

मुंबई | 6 नोव्हेंबर 2023 : एखादी चोरी करण्यासाठी चोरट्यांनी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवल्याचे तुम्ही ऐकले असेल. पण मुझफ्फरपूरमध्ये मात्र चोरट्यांनी हद्दच पार केली. त्यांनी एक एटीएम मशीन कापण्यासाठी थेट गॅस कटरचा वापर केला. आणि 34 लाख 71 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. पण पैसे लुटल्यावरही त्यांचं समाधान झालं नाही. त्यांनी थेट त्या एटीएम मशीनलच आग लावून टाकली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

खरंतर हे प्रकरण अहियापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाजार समिती येथील आहे. अहियापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरभंगा रोडवरील बाजार समितीजवळ एसबीआयचे एटीएम आहे. ४ नोव्हेंबरला पहाटे चोरट्यांनी एटीएमवर हल्ला केला. पहिले तर आत घुसताच त्या चोरट्यांनी एटीएम रूममध्ये लावलेल्या सीसीटीव्हीचे नुकसान केले, त्यामुळे त्यांचे चेहरे रेकॉर्ड होऊ शकले नाहीत.

पैसे लुटले आणि एटीएमला लावली आग

त्यानंतर त्यांनी गॅस कटरने एटीएम मशीन कापून 34 लाख 71 हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली. पण तेवढ्यावरही त्या चोरट्यांचं समाधान झाले नाही. पैसे लुटल्यानंतर त्यांनी एमटीएम मशीनला आग लावली आणि घटनास्थळावरून पळ काढला. या चोरीच्या घटनेची आणि आगीची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांना बोलावून आगही आटोक्यात आणण्यात आली. एटीएमची देखभाल करणाऱ्या कंपनीचे वकील श्याम सुंदर कुमार यांनी या घटनेबाबत पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे.

दोन चोर आतमध्ये तर इतर होते बाहेर

याप्रकरणी एसएचओ रोहन कुमार यांनी सांगितले की, बाजार समितीसमोर एक एटीएम आहे. तेथे ४ नोव्हेंबर, शनिवारी रात्री उशिरा काही चोर आले आणि त्यांनी गॅस कटर मशिनने एटीएम कापून लाखो रुपये लंपास केले. पोलिसांनी घटनास्थळावरून गॅस कटर, मशिन पाईप आणि इतर साहित्य जप्त केले आहे. पोलिसांनी एटीएम रूममध्ये लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्यामध्ये दोन लोक आत शिरताना दिसत आहेत. तर एटीएमच्या बाहेर काही लोकं दिसत होते. हल्लेखोरांची ओळख पटवली जात असून त्यांना पकडण्यासाठी पोलिसांची अनेक पथके तयार करण्यात आली आहेत. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.