खवले मांजराची तस्करी कशासाठी? पोलिसांची मोठी कारवाई; सांगलीतील कारवाईने उडाली खळबळ

कोकणातील दोघेजण काही तरी तस्करी करण्याच्या हेतूने सांगलीत येणार असल्याची माहिती सांगली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.

खवले मांजराची तस्करी कशासाठी? पोलिसांची मोठी कारवाई; सांगलीतील कारवाईने उडाली खळबळ
सांगलीत खवल्या मांजराची तस्करी करणारे गजाआडImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 04, 2023 | 7:30 PM

शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली : मिरज तालुक्यातील कुपवाड येथील अहिल्यानगर येथे दुर्मिळ खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून 12 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली. इम्रान अहमद मुलाजी, दिनेश गोपाळ डिंगणकर अशी अटक करण्यात आरोपींची नावे आहेत. पोलास अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी वन्य प्राण्यांची तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक शिंदे यांनी सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांचे विशेष पथक तयार केले होते.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला

पथकाला कोकणातील दोघेजण दुर्मिळ खवले मांजर विक्रीसाठी कुपवाड येथील अहिल्यानगर येथे येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने मंगळवारी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील सॅकची झडती घेतल्यानंतर त्यामध्ये दुर्मिळ खवले मांजर आढळले. त्याबाबत चौकशी केल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. दोघांनाही अटक करण्यात आली आहे. त्यांना कुपवाड एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

एलसीबीचे पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संदीप शिंदे, संदिप पाटील, संजय कांबळे, संकेत मगदुम, सुनिल चौधरी, गौतम कांबळे, अजय बेंदरे, संकेत कानडे, ऋषिकेश सदामते, कॅप्टन गुंडवाडे तसेच वन विभागाकडील मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार आण्णा पाटील, वनपाल तुषार महालिंग भोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हे सुद्धा वाचा

आंतरराष्ट्रीय बाजारात खवल्यांना मोठी मागणी

सदरचे खवले हे अतिशय दुर्मिळ, संरक्षित व नामशेष होत असलेल्या खवल्या मांजराचे आहे. सदरच्या खवल्यांचा उपयोग महागडी औषधे, आंतरराष्ट्रीय दर्जाची सौंदर्य प्रसाधने आदी बनविण्यासाठी केला जात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे सदर खवल्यांना आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असून, याची उच्च दराने विक्री करण्यासाठी तस्करी केली जाते. हा वन्यजीव नामशेष होण्याचे मार्गावर असल्याने खवले मांजर या प्रजातीच्या संरक्षणासाठी सदर वन्यजीवास शासनाने विशेष संरक्षित प्रजातीमध्ये समाविष्ट केले आहे.

Non Stop LIVE Update
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.
कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी, कशेडी बोगद्यातून तुम्ही प्रवास करताय?
कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी, कशेडी बोगद्यातून तुम्ही प्रवास करताय?.
शिंदेंच्या उमेदवारांची ठाकरे गटाशी थेट लढत, शिंदेंनी कुणाला दिली संधी?
शिंदेंच्या उमेदवारांची ठाकरे गटाशी थेट लढत, शिंदेंनी कुणाला दिली संधी?.
चिन्ह वेगळं, नावात साम्य, तुतारीवरून संभ्रम? कोल्हेंचा हल्लाबोल काय?
चिन्ह वेगळं, नावात साम्य, तुतारीवरून संभ्रम? कोल्हेंचा हल्लाबोल काय?.