लग्नाला 2 वर्ष झाली होती, एका अपघातानं कल्पनाचा संसार उद्ध्वस्त!

'तुझ्या नवऱ्याचा अपघातात मृत्यू झालाय' हे शब्द ऐकताच कल्पना जागेवर कोसळली

लग्नाला 2 वर्ष झाली होती, एका अपघातानं कल्पनाचा संसार उद्ध्वस्त!
दुर्दैवी अपघात.. आणि तरुणाचा जागीच मृत्यूImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Dec 01, 2022 | 2:13 PM

कल्पना आणि विपिन याचं लग्न होऊन दोनच वर्ष झाली होती. विपीन मूळचा गुजरातचा. त्याचे वडील एका मंदिरात पूजा-अर्चा करायचे. त्यांचं नाव अरुण शुक्ला. मोठ्या उत्साहात त्यांनी मुलाचं लग्न लावलं होतं. पण बुधवारी सकाळी अनर्थ घडला. बस आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात विपीन शुक्ला या 25 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. त्याची पत्नी कल्पना ही पतीच्या मृत्यूची बातमी कळल्यानंतर जागीच कोसळली. अजूनही ती पतीच्या मृत्यूच्या धक्क्यातून पूर्णपणे सावरु शकलेली नाही. तर विपीनच्या आईच्या मनावर मोठा आघात झालाय. आपला मुलगा आता जिवंत नाही, यावर त्यांचा विश्वासच बसत नाहीये. त्या दोघीही पूर्णपणे कोलमडल्यात. कल्पनाचा संसार एका अपघातानं उद्ध्वस्त केलाय. उत्तर प्रदेशच्या बहराईच इथं झालेल्या ट्रक आणि बसच्या भीषण अपघातानं कल्पनाच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलंय.

पतीच्या मृत्यूबाबत कळल्यापासून कल्पना शुक्ला यांच्या डोळ्यातील अश्रू थांबायचं नाव घेत नाही आहे. लग्नानंतरच्या दोन वर्षांच्या पतीसोबतच्या आठवणींनी कल्पना अस्वस्थ झाली आहे. यापुढचं आयुष्य पतीशिवाय कसं घालवायचं, या विचारांनी तिच्या मनात काहूर माजलंय.

या आणि अशाच काळीज पिळवटून टाकणाऱ्या एकापेक्षा एक हृदयद्रावर किस्से आता समोर येत आहे. हा अपघात घडला उत्तर प्रदेशातील बहराईच जिल्ह्यातील जरवलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत. एक प्रवासी बस आणि ट्रक यांच्या जबरदस्त धडक बसली. पहाटे 4-4.30 वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातावेळी कानठळ्या बसतील इतका जबरदस्त आवाज झाला.

लोकं साखरझोपेत होते. काही कळायच्या आतच 6 प्रवाशांचा जागीच जीव गेला. नेमकं काय घडलंय, हे जेव्हा प्रवाशांना कळलं, तेव्हा सगळेच बिथरले होते.

जयपूर येथून निघालेली प्रवासी बस 35 ते 40 प्रवाशांना घेऊन रुपईडीहा इथं निघाली होती. पण बहराईच-लखनौ हायवेवर या बसचा भीषण अपघात झाला होता. हायवेवर झालेल्या या अपघातानंतर बसमधील सर्व प्रवाशांची भंबेरी उडाली होती.

जेव्हा अपघातानंतर लोकांचे डोळे उघडले, तेव्हा बस रस्त्याच्या एका बाजूला कलंडली होती. तर लोकांचे मृतदेह रस्त्यावर फेकले गेले होते. ते दृष्य हादरवणारं होतं, असं बसमधून प्रवास करणाऱ्याच काही प्रवाशांनी सांगितलंय. या अपघातात 15 जण गंभीररीत्या जखमी झाले. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.