VIDEO | टाळाटाळ केल्याचा मनात राग, प्रेयसीला ढकललं रेल्वेखाली, थरार सीसीटीव्हीत कैद

प्रेयसीलाच लोकलखाली ढकलण्याचा प्रकार शुक्रवारी खार रेल्वे स्थानकावर घडला आहे. (boy push girlfriend under railway)

  • गोविंद ठाकूर, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 13:32 PM, 21 Feb 2021
VIDEO | टाळाटाळ केल्याचा मनात राग, प्रेयसीला ढकललं रेल्वेखाली, थरार सीसीटीव्हीत कैद
तरुणाने अशा प्रकारे त्याच्या प्रेयसीला रेल्वेखाली ढकलण्याचा प्रयत्न केला.

मुंबई : टाळाटाळ केल्याचा राग मनात धरत आपल्या प्रेयसीलाच लोकलखाली ढकलण्याचा प्रकार शुक्रवारी (19 फेब्रुवारी) सायंकाळी खार रेल्वे स्थानकावर घडला. या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.  या अपघातात पीडित तरुणी थोडक्यात बचावली असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी आरोपी सुमेध जाधव याला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा व्हि़डीओ सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. (young boy tried to  push his ex girlfriend under the railway, video goes viral)

मिळालेल्या माहितीनुसार वडाळा परिसरात राहणाऱ्या आरोपीची पीडित तरुणीसोबत कामावर ओळख झाली होती. दोघेही एकाच ठिकाणी कामाला असल्याने दोघांमध्ये मैत्री होती. कालांतराने त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. मात्र काही काळानंतर सुमेध हा व्यसनाच्या आहारी गेल्याचं पीडित तरुणीला समजले. त्या दिवसापासून तिने तरुणाला टाळण्यास सुरुवात केली. तरुणीने आरोपीचा फोन उचलणंही बंद केलं.

तरुणाने अशा प्रकारे त्याच्या प्रेयसीला रेल्वेखाली ढकलण्याचा प्रयत्न केला, पाहा व्हिडीओ :

 

मात्र, त्यानतंर आरोपी सुमेधने पीडित तरुणीला त्रास देणं सुरु केलं. सुमेधच्या त्रासाला कंटाळून तरुणीच्या घरच्यांनी निर्मल नगर पोलीस ठाण्यात तक्रारही दिली होती. या तक्रारीनंतर सुमेध काही दिवस शांत होता. मात्र, आता आरोपीने पीडित तुरुणीला पुन्हा त्रास देणे सुरु केले होते. तरुणी टाळाटाळ करत असल्याचा राग धरत त्यांने खार रेल्वेस्थानकावर मुलीशी हुज्जत घालणे सुरु केले. दोघांमधील वाद विकोपाला गेल्यानंतर तुरणाने संतापून तरुणीला रेल्वेखाली ढकलण्याचा प्रकार केला. मात्र, सुदैवाने या प्रकारातून तरुणी बचावली. पोलिसांनी आरोपी सुमेध जाधवला बेड्या ठोकल्या आहेत.

इतर बातम्या :

डायरीत 22 नोव्हेंबर 2021 पानावर सुसाईड नोट, पत्नी-दोन मुलांना इंजेक्शन देऊन डॉक्टरचा गळफास

व्हिडीओ गेम खेळताना मैत्री, नंतर प्रेम; अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला पोलिसांच्या बेड्या

Video : उकळत्या तेलात हात घालून महिलेच्या चारित्र्यसंपन्नतेची परीक्षा! हा कसला न्यायनिवाडा?

(young boy tried to push his ex girlfriend under the railway, video goes viral)