धक्कादायक! तरुणाला जबर मारहाण, तोंडाने उचलायला लावले जमीनीवर पडलेले बिस्कीट, पाच जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

धक्कादायक! तरुणाला जबर मारहाण, तोंडाने उचलायला लावले जमीनीवर पडलेले बिस्कीट, पाच जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात
पिंपरी चिंचवडमध्ये तरुणाला मारहाण

पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका वीस वर्षीय तरुणाला अमानुष मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत हा  तरुण गंभीर जखमी झाला आहे. मारहाणीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र फोनवर दमदाटी करण्याच्या क्षुल्लक कारणातून हा धक्कादायक प्रकार झाल्याची चर्चा आहे.

रणजीत जाधव

| Edited By: अजय देशपांडे

Jan 27, 2022 | 11:36 PM

पुणे: पिंपरी चिंचवडमधून (Pimpri Chinchwad) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका वीस वर्षीय तरुणाला (Young man beaten) अमानुष मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत हा  तरुण गंभीर जखमी (seriously injured) झाला आहे. मारहाणीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र फोनवर दमदाटी देण्याच्या क्षुल्लक कारणातून हा धक्कादायक प्रकार झाल्याची चर्चा आहे. या मारहाण प्रकरणात आतापर्यंत वाकड पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपी रोहन वाघमारे आणि मारहाण झालेल्या तरुणामध्ये हा वाद होता. मंगळवारी रात्री हा प्रकार घडला आहे. कहर म्हणजे जमीनीवर बिस्कीट टाकून या मुलाला आरोपींनी तोंडाने उचलायला लावले. त्यानंतर या मुलाला लाथा, बुक्काने तसेच पट्ट्याने जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीमध्ये हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या पाठीवर आणि तोंडावर गंभीर जखमा झाल्या आहेत.

फोनवर झाला होता वाद

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, फोनवर झालेल्या वादाचे पर्यावसन भांडनामध्ये झाले. चार ते पाच जणांनी मिळून पीडित मुलाला जबर मारहाण केली. या मुलाला पट्ट्याने तसेच लाथा, बुक्क्याने मारहाण करण्यात आली. एवढेच नव्हे तर कळस म्हणजे जमीनीवर बिस्कीट टाकून त्याला ते तोंडाने उचलायला लावले. या घटनेचा व्हिडीयो सोशल मीडियाव व्हायरल झाला आहे.

पाच जणांना घेतले ताब्यात

दरम्यान घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून, मारहाण प्रकरणात वाकड पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपी रोहन वाघमारे आणि मारहाण झालेल्या तरुणामध्ये हा वाद होता. मंगळवारी रात्री हा प्रकार घडला आहे. या घटनेमध्ये संबंधित पीडित मुलगा हा गंभीर जखमी झाला आहे.

संबंधित बातम्या

Video: बुलडाण्यात भीषण अपघात, कारच्या धडकेत मुलगा रस्त्यावरुन उडाला, जगण्याशी झूंज

Pune cyber crime| पुण्यात सायबर चोराने तरुणाला घातला इतक्या लाखांना गंडा

धक्कादायक, जेवणाच्या सुट्टीत नराधमांनी डाव साधला, विद्यार्थीनीवर बलात्कार करून पळ काढला

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें