पत्नीला मेसेज करत असल्याचा संशय, तरुणाला बेदम मारहाण, व्हिडीओही व्हायरल, पती फरार

पत्नीला मेसेज करत असल्याच्या संशयातून पतीने एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

पत्नीला मेसेज करत असल्याचा संशय, तरुणाला बेदम मारहाण, व्हिडीओही व्हायरल, पती फरार
Follow us
| Updated on: Feb 08, 2021 | 2:14 PM

विक्रोळी : पत्नीला मेसेज करत असल्याच्या संशयातून पतीने एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचा (Youth Beaten By Seven People) धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. विक्रोळीत ही घटना घडली. इतकंच नाही तर या घटनेचा व्हिडीओ बनवूण तो व्हायरल करत दहशत माजवण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे (Youth Beaten By Seven People).

नेमकं प्रकरण काय?

एका महिलेला मेसेज करत असल्याचा संशयातून तिचा पती आणि त्याच्यासह सात जणांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. घाटकोपर मधील नॉर्थ बॉम्बे शाळेजवळ असलेल्या निर्जन स्थळी नेवून या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. तसेच, ही मारहाण मोबाईलमध्ये रेकॉर्ड करुन तो व्हिडीओ व्हायरलही करण्यात आला. या व्हिडीओच्या माध्यमातून दहशत पसरविण्याचा प्रयत्नही केला आहे.

अक्षित जगताप हा तरुण विक्रोळी पार्क साईटमध्ये रहातो. तो याच विभागात राहात असलेल्या एका व्यक्तीच्या पत्नीला मेसेज करत असल्याचा संशय होता.

या रागातून पतीने रोहित इंगोलेसह सहा ते सात जणांना जमवले. त्यांनी अक्षितला घाटकोपर येथील नॉर्थ बॉम्बे शाळेजवळ असलेल्या झाडीत निर्जन स्थळी बोलावलं. त्यानंतर त्याला लाकडी दांड्यानी बेदम मारहाण केली. त्याचा व्हिडीओ बनविला आणि तो समाज माध्यमात व्हायरल ही केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रविवारी घाटकोपर पोलिसांनी अक्षितला बोलावून घेत गुन्हा दाखल केला आहे (Youth Beaten By Seven People)

या प्रकरणी रोहित इंगोलेला अटक झाली आहे. तर, पतीसह सहा आरोपी फरार आहेत. मात्र, फक्त संशयातून अशा प्रकारे जीवघेणी मारहाण करीत त्याचा व्हीडीओ बनवून व्हायरल केल्याने विक्रोळी मध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Youth Beaten By Seven People

संबंधित बातम्या :

नागपूर पुन्हा हत्येच्या घटनेने हादरलं, गुंडाच्या सततच्या त्रासाला कंटाळून दगडाने ठेचून हत्या

बायकोचे नातेवाईकासोबत प्रेमसंबंध, नवऱ्याने आक्षेपार्ह स्थितीत पकडले आणि…

तिनं आधी पोर गमावलं, नंतर नवऱ्याचा दंडुक्याचा मार, नंतर जीव, बीडचा खून आरसा दाखवणारा

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.