प्रख्यात चित्रकार शिरीन मोदींची हत्या, मारेकऱ्याचाही घरातच पडून मृत्यू

आरोपी प्रफुल्ला हा शिरीन मोदी यांच्याकडे बागकाम करत होता. प्रफुल्लाने शिरीन यांच्या घरातील स्टोअररुममध्ये त्यांच्या डोक्यावर जड वस्तूने प्रहार केला. यामध्ये शिरीन मोदी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर प्रफुल्लाचाही पडून मृत्यू झाला

प्रख्यात चित्रकार शिरीन मोदींची हत्या, मारेकऱ्याचाही घरातच पडून मृत्यू

पणजी : मूळ मुंबईकर आणि सध्या गोव्यात स्थायिक झालेल्या प्रसिद्ध कलाकार शिरीन मोदी यांची हत्या (Artist Shirin Mody Murder) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिरीन यांच्याकडे बागकाम करणाऱ्या व्यक्तीनेच ही हत्या केली. पळ काढताना पडून जखमी झाल्यामुळे मारेकरीही घरातच मृतावस्थेत आढळला.

65 वर्षीय शिरीन मोदी आणि त्यांच्याकडे बागकाम करणाऱ्या व्यक्तीचा मृतदेह त्यांच्या गोव्यातील राहत्या घरी रविवारी दुपारी आढळला होता. सीसीटीव्हीमध्ये शिरीन मोदी यांचा माळी पळण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे.

मूळ दक्षिण मुंबईच्या रहिवासी असलेल्या शिरीन मोदी तीन दशकांपूर्वी गोव्यात स्थायिक झाल्या होत्या. उत्तर गोव्यातील आरपोरा भागात त्यांचा आर्ट स्टुडिओ आहे.

मूळ आसामचा असलेला प्रफुल्ला जाना हा शिरीन मोदी यांच्याकडे बागकाम करत होता. प्रफुल्लाने शिरीन यांच्या घरातील स्टोअररुममध्ये त्यांच्या डोक्यावर जड वस्तूने प्रहार केला. यामध्ये शिरीन मोदी यांचा मृत्यू (Artist Shirin Mody Murder) झाला.

हत्येनंतर प्रफुल्लाने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र घरातच पडून जखमी झाल्यामुळे रक्तस्राव होऊन त्याचाही मृत्यू झाला, अशी माहिती अंजुना पोलिसांनी दिली.

विनापरवाना बाईकस्वाराच्या धडकेत मृत्यू, मृताच्या कुटुंबाला एक कोटींची भरपाई

गोवा मेडिकल कॉलेजमध्ये शिरीन मोदी यांना मृत घोषित करण्यात आलं. तर स्थानिक जिल्हा रुग्णालयात प्रफुल्लालाही मृत घोषित केलं गेलं. दोघांचेही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.

शिरीन मोदी आणि प्रफुल्ला यांच्यामध्ये अनेक वेळा वाद झडत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिली आहे. तो शिरीन मोदी यांच्या घराबाहेर आऊटहाऊसमध्ये राहायचा. बागेच्या अस्वच्छतेवरुन मोदी त्याला बऱ्याच वेळा ओरडायच्या. प्रफुल्ला याला मद्यपानाची सवय असल्याचंही शेजाऱ्यांनी म्हटलं आहे.

शिरीन मोदी मुंबईतील एल्फिन्स्टन कॉलेजमधून पदवीधर झाल्या. काही काळ त्यांनी लंडनसह परदेशातील शहरांमध्ये वास्तव्य केलं होतं. मात्र तिथल्या कामाची पद्धत न रुचल्यामुळे त्या गोव्यात आल्या. गेल्या वर्षी कन्या सॅफ्रनसोबत त्यांनी ‘स्टुडिओ आरपोरा’ ही आर्ट गॅलरी सुरु केली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *