फेसबुकवर चाईल्ड पॉर्न अपलोड, कोल्हापुरात दोघांना बेड्या

कोल्हापुरात एका वेबसाईटचा वापर करुन हे पॉर्न व्हिडीओ अपलोड केले जात होते. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली.

फेसबुकवर चाईल्ड पॉर्न अपलोड, कोल्हापुरात दोघांना बेड्या

कोल्हापूर : फेसबुकद्वारे लहान मुलांचे लैंगिक (Child Pornography) छायाचित्र आणि पॉर्न व्हिडीओ अपलोड केल्याच्या घटनांमध्ये वाढ होतं आहे. कोल्हापुरात नुकतंच अशा दोन वेगवेगळ्या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली. या दोघांकडून मोबाईल सिमकार्ड असं साहित्य देखील जप्त करण्यात आलं. हा गोरखधंदा करणारे आणखी काही संशयित सायबर पोलिसांच्या रडारवर आहेत.

सोशल मीडियात चाईल्ड पोर्नोग्राफीचे प्रकार (Child Pornography) आता ग्रामीण भागात देखील वाढत आहेत. लहान मुलांचे अश्लील छायाचित्र, तसेच व्हिडीओ काही जणांकडून सोशल मीडियावर अपलोड केली जात आहेत. यातून पैसा मिळवण्याचा अशा समाजकंठकांचा प्रयत्न आहे. मात्र, फेसबुकने आता अशा लोकांवर नजर ठेवायला सुरवात केली आहे.

फेसबुक अशा प्रकारचे आक्षेपार्ह व्हिडीओ अपलोड करण्याची माहिती पोलिसांना देत आहे. दर महिन्याला असा एक अहवाल सायबर विभागाच्या पोलीस महासंचालकांना मिळतो. त्यानुसार, राज्यभरात कारवाया सुरु झाल्या आहेत. असेच, दोन प्रकार कोल्हापुरात देखील समोर आले आहेत.

हेही वाचा : पुण्यातून 500 चाईल्ड पॉर्न क्लिप अपलोड, खडक पोलिसात तिसरा गुन्हा, एकाला अटक

कोल्हापुरात एका वेबसाईटचा वापर करुन हे पॉर्न व्हिडीओ अपलोड केले जात होते. फेसबुकने दिलेल्या अहवालानंतर याप्रकरणी अमोल डिसुजा आणि विशाल आत्याळकर नावाच्या दोघांना सायबर पोलिसांनी अटक केली.

चाईल्ड पोर्नोग्राफीचं वाढतं प्रमाण

फेसबुकन दिलेल्या अहवालानुसार, राज्‍यभरात अशा 1600 प्रकरणाची चौकशी सायबर पोलीस करत आहेत. यात कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 25 प्रकरणांचा समावेश आहे. तर, चार प्रकरणी गुन्हे देखील दाखल झाले आहेत. पुण्यात अशा 700 गुन्ह्याचा तपास सायबर पोलीस करताहेत.

कोल्हापूर सायबर पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत (Child Pornography) दोघांना अटक केली आहे. तर, आणखी काही जण रडारवर आहेत.

संबंधित बातम्या :

नागपूरमध्ये चाईल्ड पोर्नोग्राफीचा धक्कादायक प्रकार उघडकीस, गुन्हा दाखल

पाच महिन्यात भारतात 25 हजार चाईल्ड पॉर्न अपलोड, महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर, अमेरिकेची आकडेवारी

Whatsapp वर पॉर्न व्हिडीओ पाठवताय? बीडमध्ये दोन गुन्हे दाखल

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *