वसई पुन्हा हादरली, पती-पत्नीचा संशयास्पद मृत्यू, पत्नीचा बेडवर तर पतीचा मृतदेह छतावर आढळला

वसईच्या एव्हरशाईन परिसरातील सेक्टर नं 04 मधील उच्चभ्रू सोसायटीमध्ये पती पत्नीचे मृतदेह सापडले आहेत.

वसई पुन्हा हादरली, पती-पत्नीचा संशयास्पद मृत्यू, पत्नीचा बेडवर तर पतीचा मृतदेह छतावर आढळला

वसई : एकाच आठवड्यात दोन वेगवेगळ्या कुटुंबातील पतीपत्नीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने वसईत एकच खळबळ उडाली आहे. गुरुवारी वसईच्या भोयदापाडा परिसरात जेवणात विषारी औषध घेऊन, पती पत्नीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. तर या घटनेला दोन दिवस होत नाही तोपर्यंत आज वसईच्या एव्हरशाईन परिसरातील सेक्टर नं 04 मधील उच्चभ्रू सोसायटीमध्ये पती पत्नीचे मृतदेह सापडले आहेत. (Crime married Couple Suicide Vasai)

पत्नीचा मृतदेह बेडवर मिळाला आहे तर पतीचा मृतदेह घराच्या छतावरील हुकवर दोरीच्या साहाय्याने लटकलेल्या स्थितीत रात्री मिळाला आहे. तुलिन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले तसेच शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. पण पत्नी पत्नीच्या मृत्यूचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस याचा तपास करत आहेत.

राहुल धना चव्हाण (वय 28) आणि त्याची पत्नी ज्योती राहुल चव्हाण (वय 23) असं या दोघा मयत पती पत्नीचे नावे आहेत. झालेला प्रकार नेमका हत्या की आत्महत्या हे आणखी समोर आले नाही. पत्नीचा मृतदेह बेडवर पडला असल्याने तिची हत्या करुन, पतीने आत्महत्या केल्याचा कयास सध्या बांधला जात आहे.

वसई पूर्व एव्हरशाईन सिटी सेक्टर न 04, मधील एक्युरिअस या सोसायटी मध्ये हे दाम्पत्य राहत होते. शुक्रवारी रात्री घरात उशीरापर्यंत लाइट बंद असल्याचं आढळून आल्यावर इमारती मध्येच राहणाऱ्या त्यांच्या नातेवाइकांनी पोलिसांना बोलावून रुमचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. हॉलमध्ये दोरीच्या साहाय्याने घराच्या छताला लटकलेल्या अवस्थेत राहुलचा मृतदेह मिळाला तर बेडरुममध्ये ज्योतीचा मृतदेह मिळाला.

तुलिंज पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला तसंच मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर दोघांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल असं पोलिसांनी सांगितलं आहे. राहुल चव्हाण अंधेरी येथे मेट्रोमध्ये सुरक्षारक्षाकाचं काम करत होता.

(Crime married Couple Suicide Vasai)

संबंधित बातम्या

दिल्लीत प्रियकराची हत्या, मृतदेहाचे तुकडे करुन गुजरातमध्ये फेकले, आई, होणारा नवरा आणि प्रेयसी अटकेत

केवळ चार हजार रुपयांसाठी मित्राची हत्या, मृतदेह नाल्यात फेकला, दोघांना अटक

मालकाची हत्या करून फरार झालेला आरोपी 19 वर्षानंतर सापडला; ठाणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *