पती अंडं खाऊ देत नाही, महिलेचा प्रियकरासोबत पोबारा

पती अंडं खाऊ देत नसल्यामुळे वैतागलेली महिला प्रियकरासोबत पळून गेल्याचा प्रकार उत्तर प्रदेशात घडला

पती अंडं खाऊ देत नाही, महिलेचा प्रियकरासोबत पोबारा

लखनऊ : पती अंडं खाऊ देत नाही, म्हणून पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याचा अजब प्रकार उत्तर प्रदेशात समोर आला आहे. दररोज अंडी खाऊ घालणं बॉयफ्रेण्डला परवडत असल्यामुळे महिलेने (Lady fled with Boyfriend) त्याची निवड केली.

उत्तर प्रदेशात राहणारं संबंधित जोडपं रोजंदारीवर काम करुन भूक भागवत असे. दिवसाचा ताळेबंद राखताना कसरत करावी लागत असल्यामुळे पत्नीच्या जिभेचे चोचले पुरवणं पतीला अवघड जात असे. रोज अंडं खाल्ल्यामुळे खिशाला कात्री लागते. त्यामुळे पतीने पत्नीला अंडं खाण्यास मनाई केली होती.

पती अंडं खाऊ देत नसल्यामुळे वैतागलेली महिला प्रियकरासोबत पळून गेली. विशेष म्हणजे चार महिन्यांपूर्वीही ती प्रियकरासोबत पळून गेली होती, मात्र काही दिवसांनी ती परत आली. आता अंड्यांवरुन वाद झाल्यानंतर तिने पुन्हा घरातून पळ काढला आहे.

जावयासोबत लिव्ह इनमध्ये, वादावादीतून सासूची हत्या

‘नवरा रोज अंडं खायला देत नाही’ अशी तक्रार महिलेने पोलिसात दिली होती. अंडं खाण्यावरुन शनिवारी रात्री महिलेचं पतीसोबत मोठं भांडण झालं. भांडणानंतर महिला घर सोडून गेल्याचं पतीने पोलिसांना सांगितलं.

पोलिसांनी प्रियकराचा शोध घेतला, तेव्हा प्रियकराच्या घरालाही कुलूप होतं. महिला आणि प्रियकर पळून गेल्याची शंका (Lady fled with Boyfriend) पोलिसांनी उपस्थित केली आहे.

पत्नीला अंडं खाण्याची आवड असल्यामुळे प्रियकराने फायदा घेत तिला फूस लावली, असा आरोप पतीने केला आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *