परदेशी तरुणीचे अश्लील व्हिडीओ व्हायरल, मुंबईत अभिनेत्याला अटक

मीरा रोडमधील आरोपीला परदेशी तरुणीकडून तब्बल सात लाख रुपये उकळल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे

परदेशी तरुणीचे अश्लील व्हिडीओ व्हायरल, मुंबईत अभिनेत्याला अटक

मीरा रोड : परदेशी तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिचे अश्लील व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी मुंबईतून एका अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे. मीरा रोडचा रहिवासी असलेल्या राज सिंग याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने तरुणीकडून तब्बल सात लाख रुपये उकळले (Mumbai Actor Arrested for Extortion) आहेत.

न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या 30 वर्षीय तक्रारदार तरुणीसोबत सोशल मीडियावर राज सिंगची फेब्रुवारी महिन्यात ओळख झाली होती. दोघांमधील संवाद वाढू लागला आणि ते दररोज मोबाईलवर चॅट करायला लागले. मैत्रीतून एकमेकांशी भावनिक बंध जुळले तरुणी आरोपीच्या प्रेमात पडली, असं पोलिसांनी सांगितलं.

तरुणीकडून वाढत्या जवळीकीचा फायदा घेत राजने तिचे काही खासगी व्हिडीओ आणि फोटो मागवून घेतले. आठ महिने एकमेकांशी चॅटिंग होत असल्यामुळे तरुणीने विश्वासाने राजला आपले व्हिडीओ पाठवले. मात्र फोटो आणि व्हिडीओ हाती येताच राजचा नूर पालटला.

हृतिक रोशनवरील प्रेमामुळे पत्नीची हत्या, पतीचा गळफास

‘पैसे पाठवले नाहीस, तर तुझे खासगी व्हिडीओ आणि फोटो तुझ्या कुटुंबीयांना, नातेवाईकांना आणि मित्र मंडळींना पाठवेन’ अशी धमकी राजने सप्टेंबर महिन्यात तिला दिली. ‘मुंबई मिरर’ वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.

राजने केलेल्या विश्वासघातामुळे तरुणी चांगलीच हादरली होती. धमकीला घाबरुन तिने टप्प्याटप्प्यात 10 हजार डॉलर्स म्हणजेच तब्बल सात लाख रुपये राजला पाठवले. त्यानंतर तिने पैसे पाठवण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपी राजने तरुणीचा एक व्हिडीओ तिच्या मित्राला पाठवला. त्यामुळे राजविरोधात त्या तरुणीने इमेलद्वारे मीरा रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी राजला त्याच्या घरातून बेड्या (Mumbai Actor Arrested for Extortion) ठोकल्या.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *