AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CBSE Board Exam 2021: सीबीएसई बोर्डाचा 10 वी 12 वी परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय, परीक्षा केंद्र बदलाबाबत महत्त्वाची घोषणा

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन (CBSE) ने बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे.  cbse board exam 2021

CBSE Board Exam 2021: सीबीएसई बोर्डाचा 10 वी 12 वी परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय, परीक्षा केंद्र बदलाबाबत महत्त्वाची घोषणा
सीबीएसई दहावीचा निकाल लवकरच जाहीर होणार, येथे जाणून घ्या नवीन अपडेट
| Updated on: Mar 23, 2021 | 6:56 PM
Share

CBSE Board Exam 2021 नवी दिल्ली : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन (CBSE) ने बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे.   10वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्यास सीबीएसईनं परवानगी दिली आहे. सीबीएसईने ऑफिशियल वेबसाईट cbse.gov.in वर यासंदर्भात नोटीस जारी केलं आहे. सीबीएसईच्या निर्णयानुसार विद्यार्थ्यी एका केंद्रावरुन प्रात्याक्षिक परीक्षा आणि एका केंद्रावरुन लेखी परीक्षा देऊ शकतात. (cbse board exam 2021 cbse allowed students of 10th and 12th to change exam centre)

विद्यार्थ्यांना काय करावं लागेल?

विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्याबद्दलचा अर्ज त्यांच्या शाळेमार्फत करावा लागेल. अर्जामध्ये ते ज्या परीक्षा केंद्रावरुन परीक्षा देऊ इच्छितात त्या केंद्राबद्दल माहिती लिहावी लागेल. परीक्षा केंद्र बदलण्याबाबतचा अर्ज करण्याची अंतिम मुदत 25 मार्च पर्यंत आहे. विद्यार्थी सीबीएसईच्या वेबसाईट वरुन अर्ज करु शकतात.

सीबीएसईची अधिकृत नोटीस पाहण्यासाठी क्लिक करा…

सीबीएसई परीक्षेसंदर्भातील नियम

त्यासोबत, या परिक्षेसंबंधी नियमही जारी करण्यात आले आहेत. जर तुम्ही ही परिक्षा देणार असाल तर तुम्हाला हे नियम माहिती असणं गरजेचं आहे.

>> 10 वी आणि 12 वीच्या मुख्य परीक्षांमध्ये निश्चित वेळेचं अंतर असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांचा तणाव दूर होईल आणि त्यांना तयारीसाठी वेळ मिळेल.

>> 12 वीची परीक्षा दोन शिफ्टमध्ये होईल, वेळ वाचवण्यासाठी असं केलं जात आहे. दुसऱ्या शिफ्टमधील परीक्षा ही परदेशात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असेल.

>> दुसऱ्या शिफ्टमध्ये चार दिवस परीक्षा होईल. या दिवसांमध्ये 10 ची मॉर्निंग शिफ्टमध्ये मुख्य विषयांची परीक्षा असेल. यापैकी जास्त करुन परीक्षा या परीक्षा सेंटरवर होईल. दुपारची परीक्षा निवडक सेंटरवर होईल.

>> जे शिक्षक सकाळच्या शिफ्टला काम करतात त्या शिक्षकांना दुपारच्या शिफ्टला काम करावं लागणार नाही.

>> सीबीएससी बोर्ड परीक्षेचे कंट्रोलर डॉ. संयम भारद्वाजकडून जारी केलेल्या या नियमांनुसार, यावर्षी कमीत कमी दिवसांमध्ये या परीक्षा आयोजित केल्या जातील. गेल्या वर्षी 2020 मध्ये परीक्षा शेड्युल 45 दिवसांचा होत. यंदा हा 39 दिवसांचा असेल.

>> 10 वीच्या वर्गाची 75 विषयांची परीक्षा आणि 12 वीच्या 111 विषयांची परीक्षा होईल.

संबंधित बातम्या

CBSE Board Exam Dates 2021 | सीबीएसई बोर्ड दहावी-बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर, शिक्षणमंत्र्यांची घोषणा

CBSE Exam Date Sheet 2021: सीबीएसई 10 वी, 12 वी परीक्षेच्या वेळापत्रकाची रमेश पोखरियालांकडून घोषणा, टाईम टेबल कुठे पाहणार?

(cbse board exam 2021 cbse allowed students of 10th and 12th to change exam centre)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.