CMAT Answer Key 2021: सीमॅट परीक्षेची उत्तरतालिका जाहीर, आक्षेप नोंदवण्याची प्रक्रिया वाचा सविस्तर

CMAT Answer Key 2021 परीक्षेची उत्तरतालिका नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आली आहे. .

CMAT Answer Key 2021: सीमॅट परीक्षेची उत्तरतालिका जाहीर, आक्षेप नोंदवण्याची प्रक्रिया वाचा सविस्तर
सीमॅट परीक्षा
Follow us
| Updated on: Apr 05, 2021 | 10:29 AM

CMAT 2021 Admit Card नवी दिल्ली: नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं (National Testing Agency)घेतलेल्या सीमॅट परीक्षेची उत्तरतालिका जाहीर करण्यात आली आहे. कॉमन मॅनेजमेंट अ‌ॅडमिशन टेस्टचे (Common Management Admission Test) आयोजन 31 मार्चला केले गेले होते. ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली आहे त्यांनी ऑफिशियल वेबसाईट cmat.nta.nic.in वर जाऊन उत्तरतालिका (CMAT Answer Key 2021) पाहता येईल. विद्यार्थ्यांनी त्यांचा परीक्षा क्रमांक अ‌ॅडमिट कार्ड आणि जन्मतारीखेद्वारे लॉगीन करुन उत्तरतालिका पाहता येईल. (CMAT 2021 Answer Key released download from nta on cmat nta nic in)

CMAT 2021 परीक्षा उत्तरतालिकेवर आक्षेप नोंदवण्यासाठी फी किती?

कॉमन मॅनेजमेंट 2021 परीक्षा 31 मार्चला दोन शिफ्टमध्ये आयोजित केली गेली होती. या परीक्षेला बसलेले उमेदवार 5 एप्रिल 2021 पर्यंत उत्तरतालिकेवर आक्षेप नोंदवू शकतील. त्यासाठी त्यांना आक्षेपाच्या समर्थनार्थ पुरावा सादर करावा लागेल. मात्र, यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्ये आक्षेपासाठी 1 एक हजार रुपयांची फी भरावी लागेल. ही फी परत दिली जाणार नाही. 31 मार्चला पहिल्या सत्रातील परीक्षा 9 ते12 आणि 12.30 तर दुसऱ्या सत्रातील परीक्षा 3 ते 6 आणि 6.30 दरम्यान झाली.

CMAT Answer Key 2021: उत्तरतालिका कशी पाहणार

स्टेप1: विद्यार्थ्यांनी उत्तरतालिका पाहण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट cmat.nta.nic.in वर भेट द्यावी. स्टेप 2: तिथे उपलब्ध असणाऱ्या “Display Question Paper and Answer Key Challange 2021” लिंक वर क्लिक करावे. स्टेप 3: अ‌ॅप्लिकेशन नंबर आणि जन्मतारीख टाकून लॉगीन करावे. स्टेप 4: लॉगीन केल्यानंतर उत्तरतालिका तुम्हाला पाहयला मिळेल. स्टेप 5: उत्तरतालिका डाऊनलोड करुन त्याची प्रिंट काढून ठेवा किंवा फोन अथवा लॅपटॉपमध्ये सेव्ह करा

CMAT 2021 परीक्षेचे स्वरुप

CMAT 2021 परीक्षेच्या परिपत्रकानुसार ही परीक्षा एकूण 500 गुणांसाठी झाली. या परीक्षेत एकूण 125 प्रश्न विचारले गेले. 1 प्रश्नाला 4 गुण निश्चित करण्यात आले होते. तार्किक क्षमता आणि माहितीचे विश्लेषण यासाठी 25, लॉजिकल रिझनिंगसाठी 25, भाषा कौशल्यं 25, सामान्य ज्ञान 25, नाविन्यता आणि उद्योजकता यासाठी 25 प्रश्न विचारले होते.

संबंधित बातम्या:

CMAT 2021 Admit Card: कॉमन मॅनेजमेंट ॲडमिशन परीक्षेचे ॲडमिट कार्ड जाहीर , cmat.nta.nic.in इथून करा डाऊनलोड

CMAT 2021 Admit Card: कॉमन मॅनेजमेंट ॲडमिशन परीक्षेचे ॲडमिट कार्ड जाहीर होणार, cmat.nta.nic.in इथून डाऊनलोड करा

(CMAT 2021 Answer Key released download from nta on cmat nta nic in)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.