AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारावी नंतर पुढे काय? बी. फार्मसी आणि डी. फार्मसीमधील नेमका फरक काय?

बारावीचे निकाल जाहीर झाले असून विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना एमएचीटी सीईटी परीक्षांचे वेध लागेल आहेत. बारावीनंतर विज्ञान शाखेतील विद्यार्थी औषधनिर्माणशास्त्र म्हणजेच फार्मसीच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकतात.

बारावी नंतर पुढे काय? बी. फार्मसी आणि डी. फार्मसीमधील नेमका फरक काय?
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Aug 22, 2021 | 8:05 AM
Share

मुंबई : बारावीचे निकाल जाहीर झाले असून विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना एमएचीटी सीईटी परीक्षांचे वेध लागेल आहेत. बारावीनंतर विज्ञान शाखेतील विद्यार्थी औषधनिर्माणशास्त्र म्हणजेच फार्मसीच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकतात. आपल्याकडे सर्वसाधारणपणे अनेकांना बी. फार्मसी अभ्यासक्रम नेमका काय? डी. फार्मसी अभ्यासक्रम नेमका काय यातील फरक माहिती नसतो. दोन्ही अभ्यासक्रम बारावीनंतर करता येतात.

फार्मसी अभ्यासक्रमांना प्रवेशासाठीची पात्रता

विज्ञान शाखेतून बारावीला पीसीएमबी म्हणजेच भौतिकशास्त्र, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी हे विषय घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना फार्मसी अभ्यासक्रमांना प्रवेश मिळतो. त्यासाठी विद्यार्थ्यांना किमान 50 टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी महाराष्ट्र शासनाची एमएचटी सीईटी परीक्षा देऊन अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात.

बी.फार्मसी अभ्यासक्रम

बी. फार्मसी हा बारावीनतरंचा 4 वर्षांचा अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमाची विभागणी एकूण 8 सेमिस्टरमध्ये करण्यात येते. चार वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर उमेदवार औषधनिर्माण कंपनीत नोकरी करु शकतो. बी.फार्मसी उत्तीर्ण झाल्यानंतर स्वत:चं मेडिकल देखील सुरु करु शकतो.

डी. फार्मसी अभ्यासक्रम

बी. फार्मसी आणि डी. फार्मसी अभ्यासक्रम एकच आहेत, असा अनेकांचा समज असतो. मात्र, बी. फार्मसी हा चार वर्षांचा तर डी. फार्मसी हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम आहे. डी. फार्मसी म्हणजे डिप्लोमा इन फार्मसी होय. हा अभ्यासक्रम एकूण चार सत्रांमध्ये विभागलेला असतो.

अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर पुढं काय?

बी. फार्मसी आणि डी. फार्मसीचे अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी फार्मासिस्ट म्हणून स्वत:ची नोदंणी करुन घेणं आवश्यक आहे. त्यानंतर ते औषधनिर्माण कंपनीमध्ये काम करु शकतात. औषधांचे विक्री प्रतिनिधी म्हणून काम करु शकतात किंवा स्वत:ची फार्मसी म्हणजेच मेडिकल स्टोअर सुरु करु शकतात. फार्मासिस्ट म्हणून नोंदणी केल्यानंतर सरकारी रुग्णालय किंवा खासगी रुग्णालयात देखील नोकरीची संधी उपलब्ध होते. स्वयंसेवी संस्थांमध्ये देखील फार्मसी अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी नोकरी करु शकतात.

इतर बातम्या:

पुणे विद्यापीठाच्या ‘स्वच्छ वारी निर्मल वारी’ कार्यक्रमाच्या गैरव्यवहाराची होणार चौकशी, बडे मासे जाळ्यात अडकणार?

बारावी, पदवीनंतरचे अभिनय प्रशिक्षणाचे अभ्यासक्रम, मुंबई विद्यापीठात प्रवेश प्रक्रिया सुरु

बारावीनंतर पुढं काय? परकीय भाषेतील अभ्यासक्रम आणि संधी

Courses after class 12 difference between B Pharmacy and D Pharmacy

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.