AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hsc Exam hall Ticket : 12 वीच्या विद्यार्थ्यांना आज ऑनलाईन पद्धतीने मिळणार हॉलतिकीट!

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या (Student) परीक्षा ऑफलाईन (offline exam) घेण्यावरून सध्या राज्यामध्ये वाद आहे. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, काॅलेज आणि शाळा ऑनलाईन (Online) पध्दतीने झाल्या आहेत तर मग परीक्षा कशी ऑफलाईन? विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण असतानाच आता आजपासून बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने हॉलतिकीट मिळणार आहे.

Hsc Exam hall Ticket : 12 वीच्या विद्यार्थ्यांना आज ऑनलाईन पद्धतीने मिळणार हॉलतिकीट!
ExamImage Credit source: tv9
| Updated on: Feb 09, 2022 | 8:50 AM
Share

मुंबई : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या (Student) परीक्षा ऑफलाईन (offline exam) घेण्यावरून सध्या राज्यामध्ये वाद आहे. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, काॅलेज आणि शाळा ऑनलाईन (Online) पध्दतीने झाल्या आहेत तर मग परीक्षा कशी ऑफलाईन? विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण असतानाच आता आजपासून बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने हॉलतिकीट मिळणार आहे. यामुळे आता एकच गोंधळ विद्यार्थ्यांमध्ये आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षेसाठी आंदोलने देखील केली.

ऑनलाईन पध्दतीने विद्यार्थ्यांना मिळणार हाॅलतिकिट

ऑनलाईन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी बोर्डावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपला निर्णय बदलला नाही. परीक्षा ऑफलाईनच होणार हे काल बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानंतर हॉलतिकीट बाबत माहिती देण्यात आली आहे. यामुळे आता राज्यातील विद्यार्थ्यांना अभ्यास केल्याशिवाय काहीही पर्याय नाहीये. कोरोनाच्या महामारीचा विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे. यामुळेच परीक्षा ऑनलाईन घ्यावी अशी मागणी होती. दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तारखा याआधीच जाहीर केल्या असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासाला आणि परीक्षेच्या नियोजनाला पुरसा वेळ मिळाला आहे, असे बोर्डाकडून सांगण्यात येत आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा प्रश्न गंभीर

ऑफलाईन पध्दतीनेच बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार आहेत. हे आता निश्चित झाले आहे. मात्र, खरा प्रश्न येतो तो म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा. कारण गेल्या दोन वर्षांपासून जवळपास ऑनलाईन पध्दतीनेच काॅलेज झाले आहे. हातावर मोजण्या इतक्याच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आॅनलाईन पध्दतीने धडे घेतले आहेत. त्याचे कारण म्हणजे ग्रामीण भागामध्ये नेटवर्क आणि स्मार्ट फोन विद्यार्थ्यांकडे नव्हते. त्यातुलनेत शहरी भागातील विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन शिक्षण पोहचले. मात्र, ग्रामीण भागातील विद्यार्थी या बारावीच्या परीक्षेला कशाप्रकारे सामोरे जातील हा मोठा विषय आहे.

संबंधित बातम्या : 

School reopen : शनिवारी, रविवारीही शाळा सुरूच ठेवा, अजित पवारांच्या शिक्षाकांना काय सूचना?

NEET Exam : नीट परीक्षा : इंटर्नशीप डेडलाईनबाबत सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.