ICAI CA Exam 2023 : CA November च्या परीक्षेची तारीख जाहीर, या दिवशी होणार पेपर
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया तर्फे सीएच्या पुढील सेशनची परीक्षा नोव्हेंबर महिन्यात सुरू होणार असून तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यासाठी रजिस्ट्रेशन शेड्यूलही जाहीर करण्यात आले आहे.

ICAI CA November Exam 2023 : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (ICAI) तर्फे सीए इंटर आणि फायनल मे च्या परीक्षेचा रिझल्ट जाहीर करण्यात आला. त्यासोबतच CA November सेशनच्या परीक्षेच्या (exam dates) तारखाही जाहीर झाल्या आहेत. तसेच पुढील सेशनच्या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन शेड्युलही जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षेची नोंदणी प्रक्रिया (registration process) ऑगस्टमध्ये सुरू होणार आहे.
सीए फाऊंडेशन, इंटर आणि फायनल नोव्हेंबर सेशनच्या परीक्षेसाठी 2 ऑगस्ट 2023 पासून अर्ज करू शकता. 23 ऑगस्ट 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल. तर पात्र उमेदवार 30 ऑगस्ट 2023 पर्यंत विलंब शुल्कासह (late fees) अप्लाय करू शकतात. तर करेक्शनसाठी 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबरपर्यंतची मुदत मिळेल.
CA नोव्हेंबर परीक्षेसाठी कसा कराल अर्ज ?
- ICAI तर्फे जारी करण्यात आलेल्या सूचनेनुसार, CA फाऊंडेशन, इंटर आणि फायनल (2023 ) परीक्षेसाठी अर्जाची प्रक्रिया ऑनलाइन घेतली जाणार आहे.
- icai.org या अधिकृत साईटवर जाऊन नोंदणी अथवा रजिस्ट्रेशन करता येईल.
- ही रजिस्ट्रेशन लिंक 2 ऑगस्टपासून ऑफशिअल वेबसाईटवर ॲक्टिव्ह होईल. रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख येणयापूर्वी अर्ज करावा.
Important Announcement – Schedule of ICAI Chartered Accountancy Final, Intermediate & Foundation Exams for Students & PQC Exams for Members(November – December 2023 Attempt) Apply Students – https://t.co/X96ZtXmPl2 Members – https://t.co/wWKlj1vF0t Detailshttps://t.co/cOxV6ktskX pic.twitter.com/u5qWWdfTbK
— Institute of Chartered Accountants of India – ICAI (@theicai) July 5, 2023
CA November 2023 Exam डेटशीट
- ICAI CA फाउंडेशन नोव्हेंबर 2023 च्या परीक्षा 24, 26, 28 आणि 30 डिसेंबर रोजी आयोजित केल्या जातील. ICAI CA फाउंडेशन पेपर 1 आणि 2 ची परीक्षा दुपारी 2 ते संध्याकाळी 5 या तीन तासांच्या तर पेपर 3 आणि 4 ची परीक्षा दुपारी 2 ते 4 या दोन तासांच्या कालावधीत घेण्यात येणार आहे.
- सीए इंटरमिजिएट नोव्हेंबर 2023 च्या परीक्षेतील ग्रुप 1 चे पेपर 2, 4, 6 आणि 8 नोव्हेंबर रोजी होणार आहेत. तर ग्रुप 2 साठी ची परीक्षा 10, 13, 15 आणि 17 नोव्हेंबर रोजी होणार आहे. इंटरमिजिएट पेपरच्या परीक्षेचा कालावधी दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत असा तीन तासांचा असेल.
- तर सीए फायनल ग्रुप 1 ची परीक्षा 1, 3, 5 आणि 7 नोव्हेंबर रोजी आणि ग्रुप 2 ची परीक्षा की परीक्षा 9, 11, 14 आणि 16 नोव्हेंबर 2023 रोजी होणार आहे. पेपर 1 ते 5 आणि 7 व 8 हे पेपर दुपारी 2 ते 5 या तीन तासांच्या कालवधीत होतील. तर पेपर 6 हा 2 ते 6 या चार तासांच्या कालावधीत होईल. ICAI च्या वतीने ट्विट करून संपूर्ण डेटशीट जाहीर करण्यात आली आहे.
