AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

JEE Advanced मधील महाराष्ट्राच्या टॉपरने नाकारला IIT बॉम्बेचा मलाईदार कोर्स; निवडला हा पर्याय

आयआयटीसाठी जेईईची प्रवेश परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत जळगावच्या देवेश भैयाने ऑल इंडिया रँकमध्ये आठवं स्थान मिळवलंय. परंतु त्यानंतर इतरांप्रमाणे त्याने आयआयटी बॉम्बेचा मलाईदार कोर्स निवडला नाही. तर त्याऐवजी त्याने दुसरीकडे प्रवेश मिळवला आहे.

JEE Advanced मधील महाराष्ट्राच्या टॉपरने नाकारला IIT बॉम्बेचा मलाईदार कोर्स; निवडला हा पर्याय
jee advanced toppersImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 11, 2025 | 1:19 PM
Share

आयआयटीसाठीच्या जेईई या प्रवेश परीक्षेत जळगावचा एल. एच. पाटील स्कूलचा विद्यार्थी देवेश भैय्या हा ऑल इंडिया रँकमध्ये आठवा आला. या यशाबद्दल देवेश भैय्यासह त्याच्या कुटुंबाचा एल. एच. पाटील स्कूलच्या वतीने सत्कार करण्यात आला. “रँकमध्ये येण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं, मात्र मी तसा कुठला विचार केला नव्हता. फक्त माझ्यातलं जे बेस्ट आहे ते देण्याचा मी प्रयत्न केला,” अशी प्रतिक्रिया या यशानंतर देवेश भैय्याने दिली. शाळा तसंच जेईई परीक्षेचा अभ्यास मी दिवसातून दहा ते बारा तास बसून केला. जेवढं शिक्षकांनी सांगितलं त्यानुसार अभ्यास केला, असंही त्याने पुढे सांगितलं.

जेईई परीक्षा निश्चितच कठीण मानलं जातं. मात्र अभ्यासात सातत्य ठेवलं तर निश्चितच ही परीक्षा सर्वांसाठी सोपी होईल, असा विश्वास देवेश भैयाने व्यक्त केला. अनेक वर्षे अभ्यासात सातत्य ठेवणं हेच या परीक्षेतलं मोठा आव्हान आहे आणि ते जर आपण केलं तर निश्चितच सर्वांना परीक्षा सोपी जाईल, असा सल्ला त्याने इतर विद्यार्थ्यांना दिला. देवेशच्या शाळेच्या प्राचार्य तसंच त्याच्या आई-वडिलांनीसुद्धा त्याच्या यशाबद्दल अभिमान व्यक्त केला आहे. त्याची जी मेहनत आहे, त्याचंच यश त्याला मिळालं आहे, अशी प्रतिक्रिया देवेशच्या आईने दिली. तर पुस्तकाच्या पलीकडचा अभ्यास करणे ही देवेशची खासियत आहे, असं सांगत यापुढेही त्याने अशाच पद्धतीने प्रगती करावी, अशा शुभेच्छा शाळेच्या प्राचार्य शिल्पा मल्हारा यांनी दिल्या आहेत.

जेईई ॲडव्हान्स परीक्षेत ऑल इंडिया रँकमध्ये आठवं स्थान मिळवणाऱ्या देवेश भैयाने आयआयटी बॉम्बेचा बीटेक कॉम्प्युटर सायन्ससारखा आकर्षक अभ्यासक्रम सोडून अमेरिकेच्या प्रतिष्ठित एमआयटी युनिव्हर्सिटीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. आयआयटी बॉम्बेचा बीटेक कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंग पदवीच्या अभ्यासक्रमाला दरवर्षी जेईई ॲडव्हान्सच्या टॉपर्सची सर्वोच्च पसंती असते. यामागचं कारण म्हणजे देशातील आणि परदेशातील प्रतिष्ठित आयटी कंपन्यांकडून दिला जाणारा भरघोस पगार. परंतु देवेश भैयाने एमआयटीचा पर्याय निवडला आहे.

जळगावच्या देवेशचा जेईई रँकपेक्षाही मोठा विक्रम आहे. त्याने 2021 आणि 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय ज्युनियर सायन्स ऑलिंपियाडमधून दोन आणि 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र विज्ञान ऑलिंपियाडमधून एक सुवर्णपदक पटकावलं आहे. 2020 मध्ये त्याला बालशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. देवेशला मार्चमध्ये एमआयटीमध्ये प्रवेश मिळाला होता, परंतु तरीही त्याने जेईई ॲडव्हान्सची परीक्षा दिली.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.